कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी  मतदान केंद्रांची संख्या पाचशेंवर होणार

 The number of polling stations for Kolhapur Municipal Election will be 500
The number of polling stations for Kolhapur Municipal Election will be 500

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या पूर्वीपेक्षा दीडपटीने वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंग राखणे महत्त्वाचे असल्याने सुमारे 1200 ते 1400 मतदार संख्येचे केंद्र आता 700 ते 800 होणार आहे. मतदान केंद्राची संख्या 500 ते 550 इतकी होईल, असा अंदाज आहे. 


निवडणुकीची तारीख अद्याप निश्‍चित नसली तरी प्रशासनस्तरावर मतदार याद्या, तसेच मतदान केंद्रांची तयारी सुरू आहे. येत्या आठ दिवसांत मतदान केंद्रे जाहीर होतील. महापालिकेच्या शाळा याच प्रत्येक प्रभागात मतदान केंद्रे म्हणून वापरली जातात. कोरोनामुळे सोशल डिस्टंन्सिंग राखणे महत्त्वाचे आहे. मतदानादिवशी केंद्रावर पाठोपाठ एक मतदार उभे राहतात. सायंकाळी मतदान संपण्याची वेळ आल्यानंतर मतदारांची अधिक धावपळ सुरू होते. सर्दी, ताप, अशी लक्षणे असलेला मतदार आला आणि त्याचा इतरांशी संपर्क आल्यास अडचणी वाढू शकतात. त्यामुळे दोन मतदारात किमान किती अंतर असावे, हे निश्‍चित आहे. पूर्वी एक-दोन खोल्या राखून ठेवून अन्य खोल्यांचा वापर मतदानासाठी केला जात होता. एका खोलीत किमान बाराशे इतके मतदान होईल, असे नियोजन केले जायचे. आता एका केंद्राची संख्या चारशेने कमी होणार आहे. त्यामुळे सातशे ते आठशेच एका खोलीत मतदान होईल. प्रभाग किमान सहा हजार इतक्‍या लोकसंख्येचे आहेत. सहा हजार मतदानापैकी किमान चार हजार इतके मतदान होते. 
मतदार यादीच्या प्रक्रियेत किमान दहा हजार मतदारांची नव्याने भर पडली आहे. मतदारही वाढले आहेत आणि मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एखाद्या शाळेतील वर्ग खोल्या कमी पडल्यास आता सार्वजनिक सभागृहांचा मतदान केंद्र म्हणून वापर करावा लागणार आहे. मतदान केंद्रे वाढल्याने निवडणूक लढविणाऱ्यांची मात्र धांदल उडणार आहे. प्रभागातील वाढीव केंद्रांवर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
दहा हजार मतदारांची नव्याने भर 
एका खोलीत 700 ते 800 मतदान होणार 
खोल्या कमी पडल्यास सभागृहे वापरणार 

एका मतदान केंद्र 700 ते 800 मतदारांचे असेल. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणे महत्त्वाचे असल्याने एकाचवेळी गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सुमारे दीडशे मतदान केंद्रे नव्याने तयार होतील. 
- निखिल मोरे, उपायुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com