ब्रेकिंग- राजाराम तलाव परिसरात मृतदेह सापडलेल्या महिलेची ओळख पटली ; संशयीत ताब्यात

one arrested in kolhapur pachgaon women murder case
one arrested in kolhapur pachgaon women murder case

कोल्हापूर - पाचगावातील वृद्ध महिलेचा तुकडे करून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. शांताबाई शामराव आगळे (वय 75) असे त्यांचे नाव आहे. राजाराम तलावाच्या उत्तरेच्या रिकाम्या बाजूत गोणपाटात त्यांच्या मृतदेहाचे अवशेष मिळून आले. अवघ्या तासाभरात पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखीच्याच तरूणाने हा खून केल्याचे तपासात पुढे आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संतोष परीट (वय - ३५ रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट माळी कॉलनी, टाकाळा कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. 
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम तलावाच्या उत्तरेकडील रिकाम्या परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी काही जण गेले होते. यातील वैभव नावाच्या एका व्यक्तीला एका गोणपाटात मृतदेहाचे काही अवेषण असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. तसे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गोणपाटात एका महिलेच्या मृतदेहाचा महिलेचा अर्धवट मृतदेह मिळून आला. तसे पोलिस चक्रावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलिस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आले. मृतदेहाच्या अवशेषावरून तो एका वृद्ध महिलेचा असावा असा अंदाज पोलिसांनी बांधून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागली. 

मृत महिला शुक्रवारी अचानक बेपत्ता झाल्या. त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला. पण त्या मिळून आल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान आज सापडलेल्या मृतदेहाच्या अवशेषाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांनी सापडलेली साडी व पर्सवरून मृतदेह ओळखला. तसा पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच खूनाचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com