
कुडाळ येथील मित्र परिवार एकवीरा देवीचे दर्शन घेवून महाबळेश्वर -कोल्हापूर - आजरा मार्गे कुडाळकडे जात होते
उत्तूर - उत्तूर (ता.आजरा) गावाजवळ कार( क्रमांक - एम.एच.०७ ए जी ५१६६) पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. रोहित रमाकांत कुडाळकर (वय २५ रा. कुंभारवाडी, ता.कुडाळ ,जि.सिंधुदुर्ग) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (दि. १४) पहाटे चार वाजता स्मशानभूमीजवळ हा अपघात घडला. यामध्ये चालक ओंकार मेघनाथ वालावलकर (वय २४ लक्ष्मीवाडी कुडाळ), जग्गनाथ सुर्यकांत पेडणेकर ( वय ३० रा.कुडाळेश्वर,ता.कुडाळ), रघुनाथ बाबू कुंभार (वय ३० रा.कुभारवाडी ,ता.कुडाळ), बाबूराव सुभाष परब (वय २९ रा.नाबरवाडी ता.कुडाळ) हे चौघे जखमी झाले. अपघाताची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे.
कुडाळ येथील मित्र परिवार एकवीरा देवीचे दर्शन घेवून महाबळेश्वर -कोल्हापूर - आजरा मार्गे कुडाळकडे जात होते. उतूर जवळ वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याकडेला आसलेल्या सिमेंट पोलला धडकून रस्त्याकडेच्या चरीत पलटी झाली. यामध्ये रोहीत गाडीमधून बाहेर फेकला गेला. त्यामुळे तो गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. इतर चौघे जखमी झाली. अपघाताचे वृत समजताच पोलिस व नागरिकांनी जखमींना १०८ रुग्णवाहीकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल केले.
हे पण वाचा - जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य
चालकाने गाडी भरधाव वेगाने, अविचाराने चालवली व रोहीत याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ओंकार वालावलकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे