Big Breaking - कोल्हापुरात कोरोना हजार पार; आज दिवसभरात तब्बल २८ जणांना लागण 

one thousand cross corona positive patient in kolhapur
one thousand cross corona positive patient in kolhapur

कोल्हापूर - गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी होत नाही. सायंकाळी आठ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आता आलेल्या आहवालात तब्बल वीस नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आज दिवसभरातील २८ रूग्णांसह आता जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या १००९  वर पोहोचली आहे.  

गेल्या 24 तासात दोघांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १००९  एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 761 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. त्यापैकी आज दिवसभरात 13 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. 

आज पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये चंदगड तीन, करवीर सहा, शिरोळ आठ, आजरा दोन तर गडहिंग्लजमधील एकाचा समावेश आहे. यामध्ये शिरोळ मधील त्या कर्मचार्‍याच्या घरातील पाच जणांचा समावेश आहे. तसेच घरेलू महिला कामगारही पॉझिटिव्ह आली आहे. 

इंगळी येथील एकाला लागण 
इंगळी येथे एक जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. बाधित व्यक्ती पंचवीस वर्षीय तरूण असून इंगळी येथील हनुमान मंदिर परिसरात रहाते. दरम्यान, इंगळी गाव आज पासून पाच दिवसांसाठी लाॅक डाऊन करण्याचा निर्णय ग्राम पंचायतीतर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार गावच्या सर्व सीमा व रस्ते अडवण्याचे काम सुरू होते. 

बाधित व्यक्ती इचलकरंजी मधील एका नामांकीत बँकेत ऑडीट तपासणीच्या कामासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वी इचलकरंजी मधील 'त्या' बँकेतील एका कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने 'त्या' बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली. त्यामध्ये इंगळी मधील तरूणाचा स्वॅब घेण्यात आला होता. तपासणीमध्ये हा तरूण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आज तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, हा तरूण आज आपल्या घरीच थांबून होता. तो कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती सायंकाळी गावात पसरली. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासन, आरोग्य केंद्र तसेच कोरोना नियंत्रण समिती यंत्रणा सतर्क झाली. पट्टण कोडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक इंगळी मध्ये येऊन बाधित तरूण तसेच त्याच्या कुटूंबातील इतर व्यक्तींना अलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी रात्री उशिरा घेऊन गेले.

 गेल्या तीन महिण्यापासून कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर गावात काटेकोरपणे दक्षता घेतली जात असतानाच कोरोना रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. ग्राम पंचायत प्रशासन, आरोग्य केंद्र तसेच कोरोना नियंत्रण समितीमार्फत हनुमान मंदिर परिसरासह गावात औषध फवारणी तसेच इतर उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. 

बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही कसून माहिती घेतली जात असून त्यांच्यावर होम क्वारनटाईन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com