कांद्याचे घाऊक भाव झाले कमी ; किरकोळ बाजारात भाव मात्र चढेच 

onion price down in kolhapur market
onion price down in kolhapur market

कोल्हापूर - शाहू मार्केट यार्डातील कांदा - बटाटा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढ झाली आहे. अशात घाऊक दर घसरले आहेत. 150 ते 450 रूपये दहा किलो कांद्याचे भाव आहेत. तर 350 रूपये दहा किलो सरासरी भाव आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले भाव कमी होण्यास मदत होणार आहे. 

गेल्या दोन महिन्यात कांद्याचे भाव 60 ते 100 रूपये प्रति एक किलो पर्यंत वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली होती. अशात गेल्या दहा दिवसापूर्वी कोल्हापूरात इजिप्तचा कांदा त्या पाठोपाठ कांद्याची आवक नियमीत वाढत गेली. बारामती, जेजुरी, पुरंदर, अहमदनगर, श्रीगोंदा, लोणंद, बार्शी या भागातील कांदा कोल्हापूर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत आहे. अशात दक्षिण भारतातून कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आलेला माल खपवावा कोठे असा प्रश्‍न खरेदीदारां पुढे आहे. 

असे असताना गेल्या आठवडाभरापासून कांद्याची आवक पून्हा वाढू लागली. परिणामी घाऊक भाव घसरले आहेत. यात चौथ्या श्रेणीचा कांदा 150 रूपये दहा किलो तर पहिल्या श्रेणीचा कांदा 450 रूपये दहा किलो तर सरासरी भाव 300 ते 350 रूपये दहा किलो असा भाव आहे. अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली. 

स्थानीक किरकोळ बाजारपेठेत तिसऱ्या व दुसऱ्या श्रेणीचा कांदा विकला जातो. त्याचे भाव 60 ते 80 रूपये एक किलो प्रमाणे आहेत हे भाव आणखी दहा ते वीस रूपयांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. 
 
13 लाख क्विंटल आवक 
शाहू मार्केट यार्डात घाऊक बाजारपेठेत कांद्याची आवक 13 लाख 35 हजार क्विंटल इतकी आहे. रोज सरासरी 4 हजार 500 क्विंटलची आवक होत आहे. येत्या आठवडाभरातही आवक आणखी वाढल्यास भावा आणखी कमी होण्याची शक्‍यता व्यापारी सुत्रांनी वर्तविली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com