कांदा आला आवाक्‍यात ; पहा किती झाला दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion prices down

लेभाज्या अन्‌ फ्लॉवरची आवक बाजारपेठेत प्रचंड वाढली आहे. परिणामी, पालेभाज्या, अन्य फळभाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.

कांदा आला आवाक्‍यात ; पहा किती झाला दर

कोल्हापूर : पालेभाज्या अन्‌ फ्लॉवरची आवक बाजारपेठेत प्रचंड वाढली आहे. परिणामी, पालेभाज्या, अन्य फळभाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. विशेषत: फ्लॉवरचे ढिग अनेक ठिकाणी दिसत आहे. याबरोबर कोबीची आवक ही खूप वाढली आहे. अन्य फळांचे, कडधान्यांचे दर स्थिर आहेत. कांदाही स्वस्त झाला आहे. पुणे, मिरज, सोलापूर, बेळगाव, जिल्ह्यातील काही भागातून पाले, फळभाज्या या कोल्हापूरच्या बाजारपेठेत येतात. यातील वाल वर्गीय फळभाज्यांचे दर मात्र कायम जास्त असतात. 

हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे? 

पालेभाज्या-फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये) : 
*फ्लॉवर (15/25/30 रुपयाला एक नग), कांदा (30), बटाटा (20), आल्लं (60/70), दोडका (40), काकडी (30/40), टोमॅटो (10/15/20), हिरवे वांगे (40), जांभळे वांगे (40), सिमला मिरची (ढब्बू) (30/40), वालाची शेंग (40), लसूण (160), कारले (40), भेंडी (40), दुधी भोपळा (10/15/20 रुपयाला एक नग), मुळा शेंग (40), वरणा (40), शेवगा शेंग (10/20 रुपयाला तीन शेंगा), पांढरा कांदा (60), मेथी (10 रुपयाला दोन नग), पोकळा (10 रुपयाला दोन नग), शेपू (10 रुपयाला दोन नग), हिरवी केळी (40 रुपयाला डझन), नवलकोल (10 रुपयाला दोन नग), माईनमुळा (80), कोथींबीर ((10 रुपयाला दोन नग), अळूच्या गड्डा (80), सुरण गड्डा (80), मुळा (10 रुपयाला दोन नग), बीट (15 रुपयाला दोन नग), गाजर (50), हिरवा वाटाणा (60), देशी गवारी (70/80), हिरवी मिरची (35), कोबी (10 रुपयाला एक नग), पालक (10 रुपयाला दोन नग), कांदा पात (10 रुपयाला दोन नग), करडई भाजी (10 रुपयाला दोन नग). 

हे पण वाचा - पोलिस अधिकार्‍यानेच दिल्या सात जागी धडका; मृतदेहासह नातेवाईक पोलिसाच्या घरी... 

धान्याचे दर (प्रतिकिलो रुपये) : 
बार्शी शाळू (40 ते 52), गहू (28 ते 38), हायब्रीड ज्वारी (30 ते 38), बाजरी (32), नाचणी (36), तुरडाळ (92 ते 96), मुगडाळ (100), उडीद डाळ (122 ते 128), हरभरा डाळ (68), मसूर डाळ (64), मसुर (80 ते 140), पांढरी चवळी (80), हिरवा वाटाणा (102 ते 104), काळा वाटाणा (80 ते 100), शेंगदाणा (120), वरी (92), साबुदाणा (84), साखर (38), पोहे (44). 

फळांचे दर (प्रतिकिलो) : 
हिरवी द्राक्षे (100), थायलंड पेरु (100), माल्टा संत्री (70), डाळींब (80), पपई (80), ऍपल बोरे (40), किवी फळ (100 रुपयाला चार नग), थायलंड चिंच (90 रुपये पाव किलो), इराणी सफरचंद (140), तुर्की सफरचंद (220), इजिप्त संत्रे (140/150), काळी द्राक्षे (100), टरबूज (50 रुपयाला तीन नग), अननस (60 रुपयाला एक नग), चिक्कू (60), साधी बोरे (40), साधी केळी (40/50), जवारी केळी (60/70). 

Web Title: Onion Prices Down

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur