ऑनलाईन रंगला संगीत महोत्सव...! 

Online Rangala Music Festival in kolhapur
Online Rangala Music Festival in kolhapur

कोल्हापूर :  जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संगीत महोत्सवांचे आयोजन झाले. 
गुणीदास फाउंडेशन आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सकाळी पाऊणेनऊ ते रात्री दहापर्यंत शास्त्रीय गायन, सुगम संगीत, वादन आणि संगीत तसेच अभिनय क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. "फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून या मैफलीचा आनंद सर्वांनी लुटला. 
पहिल्या सत्रात ज्येष्ठ शास्त्रीय आर्गनवादक डॉ. ज. ल. नागावकर, अरविंद लाटकर यांची मुलाखत प्रवीण चिपळूणकर यांनी घेतली. त्यानंतर सावनी धर्माधिकारी यांचे हार्मोनियमवादन, प्रांजली मोघे यांचे सुगम गायन झाले. त्यानंतर सतीश सलागरे यांची मुलाखत विश्‍वराज जोशी यांनी घेतली. दुपारच्या सत्रात विनोद ठाकुर-देसाई यांचे गायन झाले.

त्यानंतर "अभंगवाणी' हा श्रीधर सुतार यांचा कार्यक्रम झाला. "नाट्यपराग' मैफलीत नीला नागावकर यांचे गायन झाले. त्यांना मृणालिनी परुळेकर यांची व्हायोलिन साथ होती. त्यानंतर ज्येष्ठ उद्योजक दिलीप गुणे यांची मुलाखत, पद्मनाभ जोशी, डॉ. शर्मिन मोमीन यांचे हार्मोनियमवादन, पाखी चंदगडकर आणि अश्विनी जोशी यांचे सुगम गायन, साहेबराव सनदी यांचे तबलावादन, अश्विनी जोशी आणि सविता शिपूरकर यांचे सुगम गायन, सौरभ शिपूरकर आणि श्रुती शिपूरकर यांचा "स्वरसंवादिनी' कार्यक्रम, प्रियांका मोघे आणि महेश्वरी गोखले यांचे सुगम गायन, सावनी धर्माधिकारी आणि वरद कुऱ्हेकर यांची पाश्‍चिमात्य संगीत तर सविता शिपूरकर, प्रियांका मोघे आणि महेश्वरी गोखले यांचे सुगम गायन झाले. प्रेषित शेंडगे आणि महेश दळवी यांची हिंदी चित्रपट गीतांची मैफल आणि त्यानंतर साळोखे बंधू यांच्या सेव्हन मेलडीज्‌ कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली. दरम्यान, डॉ. अजित शुक्‍ल, दर्शन शिपूरकर, शेखर फडणीस, प्रशांत जोशी, प्रवीण लिंबड आदींच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com