जवळच्या नातेवाईकांना संधी, चार हजारावर उमेदवार बेदखल

Opportunity to close relatives, eviction of candidates
Opportunity to close relatives, eviction of candidates

कोल्हापूर : परीक्षा किंवा मुलाखती न घेता तसेच पणन संचालकांनी भरती संदर्भात घालून दिलेल्या नियम व अटी डावलून जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीने एक नव्हे दोन नव्हे 29 कर्मचाऱ्यांची भरती होत आहे. परस्पर होणाऱ्या या भरतीत बाजार समितीच्या बहुतांशी संचालकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना स्थान दिले आहे. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज केलेले हजारो उमेदवार बेदखल झाले आहेत. अशा बेकायदेशीर भरती संदर्भात जिल्हा उपनिंबधकांकडे तक्रार आली आहे, त्याची चौकशी होणार का? असा प्रश्‍न उमेदवार विचारत आहेत. 

जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत 24 जागा भरतीसाठी गेल्या वर्षी जाहिरात निघाली. त्यासाठी चार हजारांवर अर्ज आले. पुढे लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्याने भरती थांबली होती पुढे पणन संचालकांनी या भरतीची मुदत संपल्याने परवानगीच नाकारली. अशा स्थितीतही भरती करण्यासाठी बाजार समितीच्या काही संचालकांनी चंग बांधला. यात 13 संचालक भरतीसाठी प्रयत्नशील होते. तर चार संचालकांचा बेकायेदशीर भरतीला विरोध केला होता यातून भरती विषयी सहकार निंबधकांकडे तक्रार केली. 

वास्तविक बाजार समितीतील 16 ते 18 व्यक्ती पदोन्नतीसाठी पात्र आहेत. त्याची पदोन्नती दिलेली नाही. नवीन कर्मचारी भरतीमुळे वेतनाचा ताण पडणार आहे.अर्ज केलेल्या उमेदवारांची संधी नाकारली गेली आहे. 

याबाबत कहर असा की, पणन संचालकांनी घातलेल्या अटी शर्ती, नोकरी भरतीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात आहे. बाजार समितीतील पदोन्नतीचा प्रश्‍न कायम आहे. तरीही नियमातील पळवाटा शोधत भरती झाली आहे. यापूर्वी बाजार समितीत नोकरी केलेली नाही तरीही कागदोपत्री हे कर्मचारी पूर्वीपासून कामावर आहेत. असे दाखवून कर्मचारी भरती झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे यांनीही बाजार समितीने केलेल्या नियमबाह्य भरती प्रकरणी जिल्हा निंबधकाकडे तक्रार दाखल केली आहे. 

शेती उत्पन्न बाजार समितीत 29 जागांसाठी होत असलेली भरती प्रक्रीया बेकायदेशीर आहे. त्याबाबत जिल्हा उप-निंबधकांकडे आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे, याशिवाय पणन संचालकांकडेही आम्ही तक्रार केलेली आहे. 
- नाथाजी पाटील, संचालक, बाजार समिती 


एकूण जागा अशा 
लिपिक 15 , शिपाई 4, सुरक्षा रक्षक 9 अभियंता 1 असे एकूण 29. 

अचानक झाला हा बदल 
बाजार समितीची कर्मचारी रोज ज्या मस्टर वर सह्या करतात ते जुने मस्टर आज अचानक पणे बदलले नवीन मस्टर घालून जुन्या कर्मचाऱ्यांना मागील दिवसांच्या (एक जुलै पासुन)च्या सह्या करण्यास सांगितले. त्यामुळे जुने कर्मचारीही संभ्रमीत झाले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com