पंचगंगा नदी काय तुझ्या नावावर आहे ? म्हणत त्यांनी कचरा टाकण्यास केली सुरुवात ...

संदीप खांडेकर
शनिवार, 23 मे 2020

सुमारे दोन महिन्यांच्या संचारबंदीत पंचगंगा नदी नितळ झाली.मात्र आता....

कोल्हापूर  : पंचगंगा नदी काय तुझ्या नावावर आहे? तू पंचगंगेचा मालक आहेस काय? तू आम्हाला सांगणारा कोण? अशी प्रश्नांची सरबत्ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर करत अखेर नागरिकांनी संचारबंदीच्या काळात नितळ झालेल्या पंचगंगा नदीत नैवेद्य, प्लास्टिक कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे.
काल (शुक्रवार) अमावस्या असल्याने नदीत पडलेला नैवेद्याचा खच व अन्य कचऱ्याची महापालिकेचे कर्मचारी व प्रजासत्ताक संस्थेच्या वतीने आज स्वच्छता करण्यात आली.

संचारबंदीत नागरिक घरातच बसून होते. कारखाने, नदीकाठचे छोटे उद्योग बंद असल्याने नदीतील प्रदूषणाचे प्रमाणही कमी होते. सुमारे दोन महिन्यांच्या संचारबंदीत पंचगंगा नदी नितळ झाली. नदीच्या मध्यभागी असणारे मासे काठावर येऊ लागले. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर मात्र नागरिकांची नदीमध्ये वर्दळ वाढत आहे. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नैवेद्य नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना नदीत कचरा टाकण्यासपासून रोखण्यापासून जरूर रोखत आहेत.

हेही वाचा- ब्रेकिंग -  सिंधुदुर्गात सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह..

मात्र, त्यांना नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. काल ही तोच प्रकार घडला.‌ कर्मचाऱ्यांना नागरिकांचा राग सहन करावा लागला.महापालिकेचे कर्मचारी अशोक बनगे, विजय पुजारी यांनी आज सकाळपासून नदीतील नैवेद्य, कचऱ्याची साफसफाई करण्यास सुरुवात केली. प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई व अन्य कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले. दुपारपर्यंत त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. 

त्या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ ; प्रकाश जावडेकर

नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. पंचगंगा नदी स्वच्छ ठेवूया, असे आम्ही आवाहन करतो. ऐकणारे ऐकतात. न ऐकणारे अंगावर येतात. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

- अशोक बनगे, विजय पुजारी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panchganga river water pollution in kolhapur