भोपाळचे प्रसिध्द बासरीवादक अभय फगरे यांना पन्नालाल घोष गौरव पुरस्कार जाहीर

Pannalal Ghosh Gaurav Award to Abhay Fagre kolhapur
Pannalal Ghosh Gaurav Award to Abhay Fagre kolhapur

कोल्हापूर:  येथील पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनातर्फे दिला जाणारा पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कार भोपाळचे प्रसिध्द बासरीवादक पंडित अभय फगरे यांना दिला जाणार असल्याची माहिती संयोजक प्रा. सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


सोमवारी (ता.28) देवल क्‍लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होणार असून प्रसिध्द बासरीवादक नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी अनुपम वानखेडे यांची बासरी आणि सारंग फगरे यांच्या गायनाची जुगलबंदी होईल. पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरीवादनाची मैफलही यावेळी होईल. त्यांना गिरीधर कुलकर्णी, प्रशांत देसाई यांची तबला साथ असेल. यंदा कोरोनामुळे सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत ही मैफल रंगणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल. या मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी प्रा. जगताप यांनी केले. 

प्रसिध्द बासरीवादक प्रा.सचिन जगताप हे गेली 19 वर्षे कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना पदरमोड करून या संमेलनाचे आयोजन करतात. बासरीचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी संगीत संमेलनाबरोबरच बासरी वादनाची मोफत शिबिरेही घेतली आहेत. आजवरच्या संमेलनामध्ये पंडित के. एल. गींडे, पंडित राजेंद्र कुलकर्णी, सुरमणी विवेक सोनार, पंडित रोणू मजुमदार, पंडित नित्यानंद हळदीपूर, पंडित राकेश चौरसिया, पंडित रूपक कुलकर्णी, पंडित राजेंद्र प्रसन्ना, पंडित प्रविण गोडखिंडी, पंडित .सुनिल कांत गुप्ता आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बासरीवादकांना ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. पत्रकार परिषदेला राजेंद्र हंडे, अजय कुरणे, तुषार वेसणेकर, रोहन विचारे आदी उपस्थित होते.  

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com