esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; परीक्षेआधीच होणार पेपर तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

Paper examination will be done before 12th examination

सध्याची परिस्थिती पाहता अजून एक महिना तरी इंग्रजीचा पेपर घेणे शक्‍य होणार नाही.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; परीक्षेआधीच होणार पेपर तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाऊनमुळे बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर शिल्लक असला तरी उर्वरीत पेपरची तपासणी करण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे पेपर तपासणीला लवकरच सुरुवात होणार असून सामाजिक अंतर राखण्यासाठी पेपर तपासणी केंद्रावर एका खोलीत फक्‍त 12 ते 15 प्राध्यापक मुल्यमापनाचे काम करणार आहेत. 


कोरोनाच्या संकटामुळे अद्याप बारावीची परीक्षा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेवटचा पेपर पार पडल्यानंतर पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अजून एक महिना तरी इंग्रजीचा पेपर घेणे शक्‍य होणार नाही. याची दखल घेत निकाल जाहीर होण्यास अधिक विलंब होऊ नये यासाठी परीक्षा पूर्ण आधीच पेपर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हे पण वाचा -  तो कर्नाटकातला, ती महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...

दरवर्षी राज्यातील 54 केंद्रावर पेपर तपासणी केली जाते. मात्र यावेळी किती केंद्रावर पेपर तपासणी करावी याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र कोरोनामुळे सर्व शैक्षणिक जिल्हांमध्ये पेपर तपासणी करावी त्यामुळे मुल्यमापकांना ये जा करणे सोपे जाईल अशी मागणी राज्य पदवीपूर्व प्राध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हानिहाय पेपर तपासणी करावी याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. 

यावेळी राज्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये कन्नड, इकॉनॉमिक्‍स, कॉमर्स व इतिहास विषयाच्या उत्तर पत्रिकांची संख्या 4 लाखांहून अधिक आहे. तर पेपर तपासणीसाठी 21 हजार मुल्यमापकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पेपर तपासणीचे काम सुरु झाल्यानंतर 20 दिवसात मुल्यमापनाचे काम पूर्ण केले जाणार आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यावेळी पेपर तपासणीचे काम सामाजिक अंतर राखून व आरोग्याची काळजी घेऊन करावे लागणार आहे. 

हे पण वाचा - बापरे; तुम्ही तरी असे फसू नका! मोबाईल कंपनीतून बोलला अन् घातला तब्बल एवढ्या लाखाला गंडा
 

पेपर तपासणी करताना सामाजिक अंतर राखने आवश्‍यक आहे. त्यामुळे पेपर तपासणीचा निर्णय घेताना सर्व गोष्टिंचा विचार करणे आवश्‍यक असून शेवटचा पेपर लवकर घेऊन एकाचवेळी पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात यावे असे वाटते. 
-प्रा. छाया पाटील -मोरे, सरकारी पदवीपुर्व महाविद्यालय वडगाव