अंगावर शहारे आणणारी घटना ; एकिकडे जळत होती चिता अन् दुसरीकडे सुरू होती जत्रा 

pardi Jatra celebration on kolhapur panchganga river
pardi Jatra celebration on kolhapur panchganga river

कोल्हापूर -  गेल्या चार महिन्यापासून जगभरात कोरोनासारख्या महाभयानक रोगाने थैमान घातले आहे. अनेक लोकांचा या महामारीने बळी घेतला आहे. परंतु, ही महामारी सुरू असतानाच काही ठिकाणी माणुसकीचा विसर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पोटच्या पोरांचा नकार तर कोठे मृतदेहासोबती हेळसांड होत आहेत. कोल्हापुरात यापेक्षाही भयानक घटना घडली आहे. मृतदेह जळत असताना त्याच्यापासून दहा ते बारा फुटांच्या अंतरावर मटणाची जत्रा सुरू होती. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढत असताना कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर बिनधास्तपणे जत्रा सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी, कोरोनाचा संसर्ग गल्ली बोळापर्यंत येऊन भिडला आहे; पण येथे सोशल डिस्टन्स विसरून जाऊन बिनधास्त  यात्रा चालू आहेत. ज्या दशपिंडी घाटावर ही जत्रा चालू आहे तेथून स्मशानभूमी दहा ते पंधरा पावलांवर आहे.  ज्या क्षणी तेथे एक चिता वाऱ्याने फरफरत जळत होती त्याचवेळी दुसरीकडे मटणाच्या जेवणाचा बेत सुरू होता. कोरोनाने मृत झालेल्या इचलकरंजीच्या वृद्धावर काही वेळापूर्वी याच स्मशानभूमीत अंत्यविधी झाला होता. त्या चितेची अजून आगही विझली नाही तोपर्यंत तेथूनच जवळ ही यात्रा सुरू होती. 

आषाढ महिन्याच्या प्रत्येक सोमवारी पंचगंगा घाटावर परडी भरण्याची प्रथा असते. या परडीसाठी कोणी बोकड तर कोणी कोंबडी कापून त्याचा नैवद्य करत असताता. ही परडी करून जवळच्या नातेवाईकांना जेवणासाठी बोलविले जाते. सालाबादप्रमाणे कालही पंचगंगा घाटावर अशाच परडीच्या जेवणाचे नियोजन अनेकांनी केले होते. परंतु, यावेळी त्यांना कोरोचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com