कर्ज भरा, कर्जमाफी मिळवा 

Pay off debt, get debt forgiveness
Pay off debt, get debt forgiveness

कोल्हापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या व दोन लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली. 

राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत राज्यातील 30 लाख 12 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 19 लाख शेतकऱ्यांना कोरोनाच्या आधी 12 हजार कोटी रुपये कर्जमाफी दिली आहे. सार्वजनिक निवडणुकीची आचारसंहिता व तांत्रिक अडचणीमुळे 11 लाख 12 हजार शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये द्यावयाचे आहेत.

कोरोनामुळे राज्याचे आर्थिक स्त्रोत आटले असून कालच रिझर्व्ह बॅंकेचे प्रमुख शक्तीकांत दास यांनी भारत देशाचा विकासाचा दर (जीडीपी) शून्य टक्के राहील, असे जाहीर केल्यावर लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला आहे, असे पत्रकात म्हटले आहे. 
तरीही राज्य सरकारने जे शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. परंतु; पैसे जमा केलेले नाहीत त्यांना या खरीप हंगामात कर्ज मिळावे म्हणून सर्व बॅंकांना स्वतःची थकहमी दिली असून शासनाच्या नावे येणे दाखवून शेतकऱ्यांची थकबाकी निरंक करून त्यांना कर्ज द्यावे, अशी हमी घेतली आहे. 

उर्वरित नियमित कर्ज भरणारे व दोन लाखावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत असते त्यांनी, कर्जाची पूर्णफेड केली तर त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये व ज्यांची रक्कम दोन लाखांवरील आहे, त्यांनाही दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. 30 जूननंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती? रक्कम किती व दोन लाखावर शेतकरी किती व रक्कम किती याची माहिती घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार शासन कर्जमाफी देण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वी कर्ज भरावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. 

दृष्टिक्षेपात कर्जमाफी 
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी - 46,974 
यापैकी लाभ मिळालेले शेतकरी - 39070 
मिळालेली रक्कम - 229 कोटी रुपये 
कर्जमाफी न मिळालेले शेतकरी - 7,904 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com