PM Kisan schem farmer Aadhaar card error in kolhapur marathi news
PM Kisan schem farmer Aadhaar card error in kolhapur marathi news

आधारकार्ड लिंक करा आणि या योजनेचा लाभ घ्या....

कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड जोडणे आवश्‍यक होते. दरम्यान, जिल्ह्यातील ६८ हजार २२९ शेतकऱ्यांच्या आधारकार्डमध्ये त्रुटी असल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी तलाठी किंवा ग्रामसेवकांच्या मदतीने आधारकार्ड खात्याला लिंक करून प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

आधारकार्ड लिंक करून घ्या
श्री. देसाई म्हणाले, ‘‘पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली आधारकार्डमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. दरम्यान, त्रुटी दूर करण्यासाठी ज्या-त्या गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसेवक किंवा तलाठ्यांकडून आधारकार्ड लिंक करून घेतले पाहिजे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी लागले. या त्रुटी दूर केल्यानंतर वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ मिळण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे उद्यापासूनच आधारकार्ड लिंक करण्यासाठी गती घ्यावी.’’

तालुका  त्रुटी असलेले आधारकार्ड धारक
कागल     १२ हजार 
करवीर     ११ हजार ९००
शिरोळ     ९ हजार ३००
हातकणंगले     ७ हजार ३००
चंदगड     ५ हजार ५८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com