.... अन् माळरानावरील भटक्यांची पालं लागली आनंदानं डोलू !

police offcier  and EGO help all people in hupari kolhapur martahi news
police offcier and EGO help all people in hupari kolhapur martahi news

हुपरी (कोल्हापूर) : जनता कर्फ्यु आणि त्यानंतर लागू झालेली संचारबंदी याचे चटके लोकांना बसत आहेत. माळरानं, वाड्या वस्तीवर पालं टाकून पोटाची आग भागवण्यासाठी भटकंती करत फिरणाऱ्या भटक्या, मागास, सर्व सामान्य, गोरगरीब कुटुंबांची होरपळ होऊ लागली आहेत. अशा स्थितीत येथे हातावर पोट असणाऱ्या कुटूंबांना मायेचा घास भरवण्यासाठी खाकी वर्दी बरोबरच दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था पुढे धावल्या आहेत. 

येथील पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी येथे ठिकठिकाणी राहणाऱ्या भटक्या, कष्टकरी कुटूंबांसाठी स्वतः तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केलाच. शिवाय त्यांनी इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत असून स्वतःहूनही कांही दानशूर लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या भटक्या लोकांची पालं आनंदाने डोलू लागली आहेत. 

भटक्या लोकांची पालं डोलू लागली

येथे माळरान असलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज विकास मंडळाच्या जागेवर गेल्या अनेक दिवसांपासून भटकी कुटुंब पालं आणि झोपड्या टाकून राहतात. जुनी भांडी दुरूस्ती, चटई, आयुर्वेदिक औषधे, जडीबुटी विकणारी पन्नासहून अधिक कुटुंब बायका पोरांसह रहायला आहेत. तसेच शहरात अन्यत्र कोल्हापूर वेस येथे आईसक्रीम विक्रेते, आबा नाईक शाळे समोर पाथरवट, वाळवेकर नगर येथे बहुरूपी कुटुंब रहायला आहेत.गावोगावी भटकंती करत पारंपारिक व्यवसाय करून ही कुटुंबे उदरनिर्वाह चालवतात

कुटूंबांवर उपासमारीची आली वेळ

जनता कर्फ्यु नंतर अचानक संचारबंदी लागू झाली. अन या कुटुंबांवर आकाशच कोसळल्या सारखी अवस्था झाली. बाहेर फिरणे बंद झाले. व्यवसाय, धंदापाणी बंद पडला. परिणामी पैशाची आवक थांबली. जवळ जे काही अन्न धान्य शिल्लक होते ते एक दोन दिवसांतच संपले. त्यामुळे या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली.

पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने हालचाली करत स्वतः अन्नधान्य स्वरूपात मदत केली. स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याशी संपर्क साधला आणि मदतीचे आवाहन केले. त्यानुसार या भटक्या लोकांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सद्याच्या संचारबंदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखत असताना दुसरीकडे सामाजिक भान जपण्याचे कर्तव्य पार पाडण्याची पोलीसांची तसेच दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांची भुमिका कौतुकाचा विषय बनली आहे. 

यांनी दिला मदतीचा हात
 हुपरी पोलीस ठाणे  उद्योजक राजेंद्र शेटे, मोहनराव खोत, सतीश भोजे, नगरसेवक सूरज बेडगे, शाहू म्हेत्रे, महावीर गाट फौंडेशन, भरत लठ्ठे फौंडेशन, दौलतराव पाटील फौंडेशन, रोटरी क्लब, लब्बैक इमदाद फौंडेशन, सुभाष ससे फौंडेशन, वीर सेवा दल, हिल ग्रुप 1997 बॅच, श्री सिद्धिविनायक सेवाभावी संस्था, शिवसेना शहर तसेच महिला तालुका आघाडी, वंचित बहुजन आघाडी, विशाल नगर विकास मंच, हिंदवी स्वराज्य संघटना,त्रिमूर्ती ग्रुप चांदी नगर इत्यादी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com