
आजरा : आजरा गडहिंग्लज मार्गावरील एका खासगी दवाखान्याच्या दारातच महिलेची प्रसुती झाली. आज सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधीत महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह यांच्या घोळात तिला कोणत्याही रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही. शेवटी आजऱ्यात आल्यावर संबंधीत महिलेला खासगी दवाखान्यातून होकार मिळाला. पण तत्पुर्वी तिला प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. वेदना सहन न झाल्याने दारातच ती प्रसुत झाली. या प्रकारामुळे कोरोना काळात गरोदर महीलांबरोबर जनतेचे होणारे हाल उघड होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवले जात आहे.
हेही वाचा - स्वच्छतेच्या दूताला केला सलाम ; कोण तो वाचा
नातेवाईकांनी सांगितलेली माहीती अशी की, आजरा शहराजवळी एका गावातील महिलेचे सासर गडहिंग्लज तालुक्यात आहे. संबंधीत महिलेचे गडहिंग्लज येथे प्रसुतीपुर्व काळाची तपासणी सुरु होती. आज शनिवार (5) सकाळी 9 वाजल्यापासून संबंधीत महिलेच्या पोटात दुखू लागले. तिच्या नातेवाईकांनी गडहिंग्लज येथील विविध दवाखान्यात हलवले पण तिथे त्यांना नकार मिळाला.
त्यानंतर त्यांनी नेसरीमधील ग्रामिण रुग्णालयात संबंधीत महिलेला दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही सिझरींगसाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्यांना नकार मिळाला. शेवटी आजरा येथील एका खासगी रुग्णालयात चौकशी केल्यावर होकार मिळाला. तिला घेवून नातेवाईक आजऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले. पण तिला प्रसुतीच्या वेदना झाल्याने असह्य झाल्याने तिची दवाखान्याच्या दारातच प्रसुती झाली. संबंधीत दवाखान्यातील डॉक्टर दाम्पत्यांने तिची प्रसुती केली. तिला सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या. कोरोनाचा अहवाल तिचा पॉझीटीव्ह की निगेटीव्ह याच्या घोळात हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.
......तब्बल दहा तास तिने सहन केला त्रास
आज सकाळी नऊ वाजल्या पासून तिला पोटात दुखू लागले. त्या वेळेपासून नातेवाईक तिला एका गाडी घेवून दवाखान्यांचे दरवाजे ठोठावत होते. पण कोठेही त्यांना दाद मिळत नव्हती. तब्बल दहा तास तिला त्रास सोसावा लागला. अखेर तिची खासगी दवाखान्याच्या दारात प्रसुती झाली.
.... तर वणवण टळली असती !
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यासाठी गडहिंग्लज येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालाय करण्यात आले आहे. मात्र सध्या या रुग्णालयाचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. याचाच फटका संबंधीत महिलेला बसला.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.