'महिलांनी स्वतःचं स्वत्व जागवायला हवं'

the programme for women day special in kolhapur for college students
the programme for women day special in kolhapur for college students

कोल्हापूर : 'तुला माहीत नाही. तुला येत नाही,' अशी हेटाळणी करणारे शब्द कानावर पडत असतील तर महिलांनी तिचं स्वत्व जागवायला हवे. राजमाता जिजाऊ व महाराणी ताराबाई यांचे इतिहासातील कर्तुत्व लक्षात घेतले तर महिला कधीच अशक्त नव्हती, हे सिद्ध होते. त्यामुळे विद्यार्थिनींनो, कठपुतली होऊन जगण्यापेक्षा वेळीच जाग्या व्हा आणि मानाने सन्मान मिळविण्यास सज्ज व्हा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी आज येथे केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेशन नेटवर्क (यिन) व विवेकानंद महाविद्यालयाच्या सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पती युवराज संभाजीराजे छत्रपती व मुलगा यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या नात्यातील पदर उलगडत त्यांनी अवतीभवती असणाऱ्या गोष्टी सेलिब्रेट करण्याचा सल्ला विद्यार्थिनींना दिला. प्राचार्य शुभांगी गावडे अध्यक्षस्थानी होत्या. महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृहात  कार्यक्रम झाला. 
संयोगिताराजे म्हणाल्या, "वर्षातील केवळ एक दिवस महिलांचा नसून, रोजचा दिवस महिलांचा आहे.

महिला म्हणून ती कधीच अशक्त नव्हती. त्यासाठी महिलांनी विचार बदलण्याची आवश्यकता आहे. भलेही एखादा निर्णय चुकू शकतो. पण, शिकण्याची वृत्ती त्यांनी सोडू नये. नेतृत्वाची हातोटी कमवायची असेल तर जे चूक ते चूक, बरोबर ते बरोबर म्हणायला शिका." संभाजीराजे व्यक्ती म्हणून उत्तम असून, त्यांची मोठी फॅन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुली भाग्यवान असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे म्हणाल्या, "महिला अधिकाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे समाजाची मेंटॅलिटी बदलावी लागेल. स्वतःला सिद्ध करताना महिलांना खूप मर्यादा येतात, हे वास्तव आहे. प्राचार्य गावडे म्हणाल्या, "महिलांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करायला हवा. अमुक एका टक्केवारीत त्यांना अडकवायला कशाला हवे? कोल्हापूर ते दिल्ली तख्तापर्यंत महिलांनी त्यांचे कर्तृत्व गाजवावे." 

यावेळी यिनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनुजा पाटील, ऋतुजा पाटील, मानसी कुंचीकोरवी, आकांक्षा शिंदे, यशश्री शिंदे, सोनाली हुंबरे, पूजा खोपकर, सायली जरंडीकर, प्राजक्ता पाटील, प्रीती मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यिन समन्वयक अवधूत गायकवाड यांनी संयोजन केले. शिल्पा भोसले यांनी प्रास्ताविक, तर डॉ. सुनिता शिर्के यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गीतांजली साळुंखे यांनी आभार मानले.

यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आर. आर. कुंभार प्राचार्य विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि डॉ. प्रभा पाटील एस.एस.एस.स्त्री अभ्यास केंद्र यांनी केले. अविनाश शेलार, भूषण पाटील, संदेश देसाई, प्राजक्ता कुडाळकर, रजत पाटील, प्रियांका कानडे, ओंकार बंसवडे, ऋतुजा माने, अभिजीत पाटील, अक्षदा विजय मोरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष काम केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com