कोल्हापुरातील भुदरगडचा फये प्रकल्प घालतोय पर्यटकांना साद

project of faye from bhudargad kolhapur attract nature lover and tourist also in kolhapur
project of faye from bhudargad kolhapur attract nature lover and tourist also in kolhapur

कोनवडे (कोल्हापूर) : गेली आठवडाभर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धुक्याची दुलई व आल्हाददायक वारा, तुरळक कोसळणारा पाऊस, चारी बाजुंनी हिरवेगार डोंगर यामुळे भुदरगड तालुक्यातील फये प्रकल्प निसर्गप्रेमींना साद घालत आहे. फये परिसराने हिरवा शालू पांघरला आहे. मिणचे खोऱ्याला वरदान ठरलेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाची उधळण करणारा हा प्रकल्प पर्यटकांना खुणावतो आहे.

पावसाळा संपत आला की, पर्यटकांना व निसर्गप्रेमींना भटकंतीचे व सहलीचे वेध लागतात पण यंदा कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटकांच्या आनंदावर जणू विरजन पडले. पण तरीही फये प्रकल्प निसर्गप्रेमींना खुणावतो आहे. पर्यटकांना येथील धबधब्यांमध्ये भिजण्याचा मोह आवरता येत नाही. पण निसर्गाने नटलेल्या या परिसरातील अनेक मनमोहक ठिकाणे निसर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करतात.

फये प्रकल्प भुदरगड तालुक्यातील गारगोटीहून कडगावकडे जाणाऱ्या रोडवर शेंणगावपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. शेंणगावपासूनच नागमोडी वाट, रंगीत फुलांचा सुगंध, हिरवीगार झाडे मनाला भुरळ घालतात. पक्षांचा किलबिलाट, तिन्ही बाजूंनी निसर्गाची मुक्त उधळण करणारे हिरवेगार डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेला प्रकल्प पूर्ण बहरून जातो. अंगाला स्पर्श करणारे थंडगार आल्हाददायक वारे, धुक्याची दुलई, अंगावर पडणारे पावसाचे पाणी यामुळे मन प्रसन्न होते. 

तलावावर वाऱ्यासंगे डोलणारी पिके पाहून मन आनंदित होते. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला हा प्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. प्रकल्पासाठी चांगले ठिकाण असतानाही ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने निसर्गाने नटलेल्या ह्या प्रकल्पाच्या मुख्य गेटमधून पाणी गळती सुरू आहे. यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे निसर्गप्रेमींतुन नाराजी व्यक्त होत आहे. गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक वारंवार करत आहेत. पण मन मोहून टाकणारा हा प्रकल्प असल्याने अनेक निसर्गप्रेमींचे पावले नकळत इकडे वळतात. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com