रुग्णांना जेवण पुरवून सावरला संसार, लॉकडाउनच्या संकटाचे संधीत केले रुपांतर

 By providing meals to the patients, Savar converted the world into a crisis of lockdown
By providing meals to the patients, Savar converted the world into a crisis of lockdown

कोल्हापूर : शाहूपुरीत राहणारे मधुकर पुरेकर फरशी फिटिंगचे काम करतात. संचारबंदीत त्यांना घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घर चालविण्यासाठी हातपाय हलविणे जरुरीचे होते. पत्नी वैशाली मधुकर पुरेकर यांच्या डोक्‍याची चक्रे फिरली. कोरोना रुग्णांना जेवणाचे डबे देण्याचा विचार त्यांनी केला आणि कोरोना रुग्णांच्या नातलगांच्या मागणीनुसार डबे पुरविण्याचे काम सुरू केले. आजही या कामात त्या व्यस्त असतात. अडचणीच्या काळात स्वत:ला कसे सावरावे, याचा धडा त्यांनी घालून दिला आहे. 
मधुकर पुरेकर यांना चार-पाच वर्षांत कामे फारशी मिळाली नाहीत. मुलगा सिद्धेश व मुलगी श्‍वेता यांच्या शिक्षणासाठी पैशाची गरज तर होतीच. प्रसंगी गवंडी कामही त्यांच्या वाट्याला आले. या स्थितीत वैशाली यांनी पतीला साथ देण्यासाठी खाणावळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला जेवणाचे डबे कोण नेणार, चांगले खवय्ये मिळणार का, असा प्रश्‍न होता. मात्र, त्यांनी खाणावळ सुरू केल्यावर त्याला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. खवय्यांना त्यांच्या जेवणाची चव आवडली. त्यातूनच पुरेकर यांच्या खाणावळीतील जेवणाची चर्चा होऊ लागली. मधुकर पुरेकर यांचे कोरोनामुळे लॉकडाउनने काम बंद झाले. वैशाली यांनी मात्र जेवण बनविण्याच्या कामाला सुटी दिली नाही. मुलगा सिद्धेश व मुलगी श्‍वेता हिच्या शिक्षणासाठी कष्ट करण्याची त्यांनी तयारी ठेवली. कोरोना रुग्णांना जेवणाचे डबे पोचवण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. कोरोना रुग्णांचे नातलग त्यांच्याकडे जेवणाच्या डब्यांसाठी येऊ लागले. मागणीप्रमाणे डबे बनविण्याची त्यांनी तयारी सुरू केली. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या खिशाला जादा भार पडणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली. सकाळी सहाला उठल्यानंतर स्वयंपाक घरात चपाती, भात, भाजी, वरण, आमटी बनविण्याचा त्या व्यस्त होऊ लागल्या. 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी आजही त्यांच्याकडे जेवणाचे डबे नेण्यासाठी रुग्णांचे नातलग येतात. त्याचबरोबर सहा-सात गिऱ्हाईकांचे डबेही त्यांना बनवावे लागतात. 

पैशापेक्षा सेवेला महत्त्व 
पुरेकर म्हणतात, ""कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्‍वासाची आवश्‍यकता असते. तोच तुम्हाला अडचणींतून मार्ग काढायला शिकवतो. संचारबंदीच्या काळात मी जेवणाचे डबे देण्याचे काम सुरू केले. त्याचा मला खूप आधार मिळाला. मात्र, त्यातून पैसे मिळविण्यापेक्षा लोकांची सेवा करता यावी, याला मी महत्त्व दिले.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com