शेतकऱ्यांठी खूशखबर ; अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

यंदाच्या आर्थिक अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हिताच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना सौर उर्जा कृषीपंप देण्यासाठी दहा हजार कोटींची तरतुद केली आहे. त्याचा लाभ म्हणून राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे.

कोल्हापूर - यंदाच्या आर्थिक अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हिताच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना सौर उर्जा कृषीपंप देण्यासाठी दहा हजार कोटींची तरतुद केली आहे. त्याचा लाभ म्हणून राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. त्यासाठी एक लाख पाच हजार सौर उर्जापंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हे पण वाचा - उन्हाळ्यात असा घ्यावा आहार....

गेल्या 2 वर्षांपासून उर्वरित महाराष्ट्रात शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपासाठी उर्वरित महाराष्ट्रात लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. आशियाई विकास बॅंकेच्या सहकार्यातून ही योजना संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. 

सौरकृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी केली असून या योजनाद्वारे प्रतिवर्ष एक लाख 5 हजार सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 670 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

हे पण वाचा -  विना खर्च लग्न करायचे आहे, मग येथे अर्ज करा
 

कृषीपंपाना दिवसा कमीतकमी 4 तास वीज देण्याची घोषणा ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्‍य आहे. तसेच उद्योगांवर असलेला क्रॉस सबसिडीचा बोजाही यामुळे कमी होण्यास मदत होईल. 

सध्या सरासरी वीज पुरवठा दर साडेसहा रुपये असून कृषिपंपाना 1 रुपया 88 पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला जातो. मात्र त्यासाठी उद्योगांवर क्रॉस सबसिडी लावून तूट भरण्यात येते. दिवसा मुबलक प्रमाणात वर्षभर स्वच्छ सुर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे सौर वीजनिर्मितीकरून कृषिपंपाच्या विजेची गरज भागविता येणार असल्याने वीज निर्मिती खर्चाची बचत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: provision of ten thousand crores to provide solar energy to the farmers in maharashtra government budget 2020