भाजपच्या देशमुखांनी घेतली महाडिकांची भेट ; पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात गाठी-भेटीला सुरवात

pune padvidhar election candidate visit to leaders for helping deshmukh visit to mahadik in kolhapur
pune padvidhar election candidate visit to leaders for helping deshmukh visit to mahadik in kolhapur

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे पदवीधर निवडणुकीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन पदवीधर निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली.

पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी नेत्यांच्या गाठी-भेटीला सुरवात केली आहे. भाजपने सांगलीच्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली. आज त्यांनी येलूर येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. भेटीबाबत महादेवराव महाडिकांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते निवडणूक रिंगणात आहेत. अजून मी निवडणुकीत काही लक्ष घातलेले नाही. योग्य वेळ आली की काय करायचे ते पाहू.’’ मात्र ही भेट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झाली असून, देशमुख यांनी महाडिक यांना सहकार्य करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उद्या देशमुख कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगाव येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ते कोल्हापुरात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.पाटील  यांची प्रतिष्ठा पणाला
पुणे पदवीधरसंघातून दोन वेळा चंद्रकांत पाटील निवडून आले. कोल्हापुरातील मतदारांनी साथ दिली. जिल्ह्यातून भाजपला अधिक मतदान होण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर असल्याने निवडणूक दादांसाठी प्रतिष्ठेची आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com