कोल्हापूरच्या अधिष्ठाताच्या बदलीला अचानक खो..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

दोघांनीही पदभार न सोडल्याने या बदलीला खो बसल्याचे चित्र आहे.  

कोल्हापूर :  राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गझभिये यांची जळगाव येथे बदली झाली. तर त्यांच्या जागी धुळ्याचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. मात्र दोघांनीही पदभार न सोडल्याने या बदलीला खो बसल्याचे चित्र आहे.  

   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत सीपीआर रुग्णालय चालवण्यात येते येथील अधिष्ठाता पद डॉ. गजभिये यांच्याकडे आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची बदली जळगाव येथे केल्याची तसेच धुळे येथील डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली कोल्हापुरात केली तसे आदेश काल काढले होते. त्यानुसार डॉ. रामानंद हे कोल्हापुरात आज येऊन अधिष्ठाता पदाचा पदभार घेणार होते. उद्या सकाळी पदभार घेईल असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

हेही वाचा- कोरोना विचारतोय..  येऊ का घरात? -

प्रत्यक्ष आज सकाळपासूनच काही घटना घडामोडी घडल्या आणि डॉ. गजभिये यांनी पदभार सोडला नाही तर डॉ. रामानंद पदभार घेण्यासाठी सीपीआरमध्ये आले नाहीत. त्यामुळे तूर्त येथील पदभार डॉ. गझभिये यांच्याकडेच आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राजकीय व्यक्तींकडून डॉ.रामानंद यांना येथे आणण्यास विरोध आहे तर डॉ. गझभिये या जळगाव येथे जाणे गैरसोयीचे असल्याने त्या ही या बदली सोयीच्या ठिकाणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आज दोन्ही अधिष्ठातानीही आपला पदभार एकमेकांकडे दिलेला नाही अशी चर्चा सीपीआर वर्तुळात आज दिवसभर सुरू होती.

हेही वाचा- ब्रेकिंग -  सिंधुदुर्गात सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह..

याबाबत डॉ. गझभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की बदलीबाबत आणखी काही दुरुस्त्या वरिष्ठ कार्यालयाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी येथेच आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काल शनिवारी कोल्हापुरात येत असल्याचे सांगितले होते. आज पुन्हा संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajarshi Shahu Maharaj Dean of Government Medical College Dr Meenakshi Ghazbhiye Transferred to Jalgaon