स्वयंसेवकांमुळे धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असेल, तर नागपूरला स्वयंसेवक नाहीत का?

सुनील पाटील
सोमवार, 13 जुलै 2020

संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या नागपुरात संघाचे स्वयंसेवक नाहीत का?असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. 

कोल्हापूर : मुंबईतील धारावीतील कोरोना नियंत्रणावरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदरा. राजू शेट्टी यांनी आरएसएसला चांगलाच टोला लगावला आहे. धारावीतील कोरोना आरएसएसच्या स्वयंसेवकांमुळे नियंत्रणात आला असेल तर संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या नागपुरात संघाचे स्वयंसेवक नाहीत का?असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. 

मुंबईतील धारावीमध्ये कोरोना वाढल्यामुळे लोक किडा-मुंगीप्रमाणे मरत होते. यावेळी मदत आणि बचाव कार्यात आरएसएसचे कार्यकर्ते जीव धोक्‍यात घालून काम करताहेत, काही कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. असे कुठेही वाचनात आले नाही. मात्र, धारावीची परिस्थिती अतिशय चांगल्या पध्दतीने हाताळली असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले. या यशानंतर आता श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे करोना नियंत्रणात आल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामुळे आता सर्वच स्थरातून चर्चेला उधान आले आहे. त्यावरूनच शेट्टी यांनी हा खोचक टोला लगावला आहे. स्वयंसेवकांच्या कामामुळे धारावीतील परिस्थिती आटोक्यात येत असेल तर आरएसएसचे मुख्य कार्यालय असणाऱ्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे माहिती नाही. असा टोलो शेट्टी यांनी लावला.  

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्‍स विभाग एका राजकीय पक्षासारखे काम करत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता कायम कशी राहिल यासाठी हे प्रयत्न करत आहेत. भाजपला गैरसोयीचे असणारे लोक बाजूला करत आहेत. या विभागाकडून वेगवेगळ्या चौकशा लावल्या जात आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजस्थान, मध्यप्रदेशमधील सरकार बदलले, कर्नाटकमध्ये अस्थितरता निर्माण केली. हिन प्रकारचा डाव करत आहेत. यापूर्वी भाजपपेक्षाही ताकदवाण पक्षाची सत्ता होती. पण सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. भाजपची निती लोकशाहीवर प्रेम असणाऱ्यांना संताप आणणारी आहे. अशाच प्रकारच हा प्रकार आहे. लोकशाहीवर निष्टा असणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि हेच शरद पवार बोलले आहेत. 

हे पण वाचा हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढा ; चंद्रकांत पाटील यांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetty criticism on rss