रणजीपटू विराज निंबाळकर यांचे निधन 

Ranjipattu Viraj Nimbalkar passes away
Ranjipattu Viraj Nimbalkar passes away

कोल्हापूर : रणजीपटू  विराज खंडेराव निंबाळकर (वय 68 ) यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, दोन बहिणी असा परिवार आहे.   

रणजीपटू मधु रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या विराज निंबाळकर यांनी रणजी क्रिकेट मध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. 1975 मध्ये सी.के. नायडू ट्रॉफीसाठी त्यांची उपकर्णधार म्हणून निवड झाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बडोदा येथे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठमध्ये झाले. बडोदा विद्यापीठाकडून चार वर्ष अंशुमन गायकवाड यांच्या नेर्तुत्वाखाली ते क्रिकेट खेळले. बडोद्याकडूनही त्यांनी रणजीचे सामने खेळले. ते या संघाचे सलामीवीर होते. तसेच ऑफस्पीन गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी सामने परतवले होते.

निंबाळकर यांची प्रशिक्षक म्हणून देखील चंगली ओळख होती. त्यांनी शशी घोरपडे, ऋतुराज इंगळे, संभाजीराजे छत्रपती, मधुकर बामणे, नंदकुमार बामणे, सचिन उपाध्ये , शकील शेख, ध्रुव केळवकर, राजेश केळवकर, अमृत शिंदे या सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जलतरण क्षेत्रात काम करत येथेही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले. निंबाळकर यांनी अनेक सामाजिक कामात देखील मोठे योगदान दिले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com