
यातच शस्त्रक्रियेसाठी लागणार 25 ते 30 लाखांचा खर्च कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर आहे
कोल्हापूर : कसबा बावडा गोळीबार मैदान येथील गणेश कॉलनी येथे राहणारा आदित्य गुरव इजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. पण, अठरा वर्षाचा आदित्य इंजिनिअर होण्यासाठी धडपडत आहे. यातच त्याच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लॅंटची) शस्त्रक्रिया करायची वेळ आली आहे. आदित्यची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची आहे.
यातच शस्त्रक्रियेसाठी लागणार 25 ते 30 लाखांचा खर्च कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी दोनशूर व्यक्तिंनीच आदित्याला मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
आदित्य गुरव हा मॅकेनिकल इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे. सर्वसामान्य कुटूंबातील आदित्यचे वडील टेम्पो चालक आहेत. सहा महिन्यापूर्वी त्याचा वारंवार पोटात दुखूत होते. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान, त्याच्या यकृताची (लिव्हरला) शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निदान झाले. पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आदित्यवर यकृताचे प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लॅंट) शस्त्रक्रिया होणार आहे.
यकृतावरील उपचार शासकीय योजनेतून होत नाही. त्यामुळे त्याच्या पालकांसमोर शस्त्रक्रियेची मोठी समस्या आहे. नातेवाईक, मित्रांकडून मिळेल तेवढी मदत सुरुच आहे. पण यातूनही त्याची शस्त्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे समाजातील जागृत आणि दानशूर लोकांनीही त्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. आदित्यवर वेळेत उपचार झाले तर तो पून्हा आपल्या इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण करू शकतो. सुखाने आणि आनंदाने समाजात वावरू शकेले. यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील आणि देश-विदेशातील लोकांनी आदित्यच्या उपचारासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
हे पण वाचा - तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार ; घटनास्थळी माणुसकी बोथट
ज्या दानशुर लोकांना आदित्यला मदत करायची आहे, त्यांनी 8485833942 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा बॅंक ऑफ इंडियाच्या कसबा बावडा शाखेत 090310110006824 या खाते क्रमांकावर आपणी देणगी वर्ग करावी. याचा आयएफसी कोड नंबर BKID 0000903 आहे.
हे पण वाचा - आधी परवानगी घ्या, मगच ‘शुभमंगल’ म्हणा ! ; प्रशासनाचा निर्णय
संपादन - धनाजी सुर्वे