
कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर वसुली तत्काळ थांबवावी, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व महिला अत्याचार निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी शासन, कंपन्यांचे अधिकारी व अन्यायग्रस्तांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरित घ्यावी. अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला.
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्य कष्टकरी महिलांना बेकायदेशीर भरमसाठ कर्जे दिली आहेत. सी बिल अपात्र असतानाही कर्ज, दोन पेक्षा जास्त फायनान्स कंपन्यांचे कर्ज, अपुऱ्या कागदपत्राद्वारे व महिलांच्या नावावर कर्ज दिले आहे. त्यावर आकारलेले बेहिशेबी व्याज, दंड व्याज, वसुली एजंटांचा चार्ज यामुळे महिलांना कर्जाच्या पाचपट रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे २०२१ पर्यंत बेकायदेशीर वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी करत दसरा चौक येथून सुरुवात झाली.
व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर शासन विरोधी घोषणा देत मोर्चा धडकला. प्रवेशद्वारावर रिपाईचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे व रुपा वायदंडे यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कारभारावर टीका केली.
बेकायदेशीर दिलेले कर्ज रद्द करावे, जिल्ह्यात संजय गांधी, निराधार देवदासी पेन्शन, श्रावणबाळ योजना व अपंग पुनर्वसनाची पेन्शन दोन दरमहा दोन हजार करावी, प्रयाग चिखली येथील आपत्ती ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनातर्फे दिलेल्या प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड दिले जात नाही, त्यामुळे विभक्त कुटुंबांना नैसर्गिक आपत्तीने बाधित समजून लाभ द्यावा.
आर.के. नगर मधील नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपीला तातडीने अटक करावी, सर्व भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमीन शासनाने कसण्यासाठी द्यावी, सक्तीने होणारी वीज बिल वसुली ताबडतोब थांबवावी, मौजे वाठार तर्फ वडगाव येथील बेकायदेशीररित्या विक्री झालेल्या जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मोर्चात संजय जिरगे, दिलीप कोथळीकर, बाजीराव जैताळकर, प्रताप बाबर, नामदेव कांबळे, विकास बुरूंगले, रघुनाथ पाटील, शंकर कराडे, शिल्पेश कांबळे, मल्लिक चिकदूळ, रुपेश आठवले, अमर कदम, सरदार कांबळे, उत्तम पाटील, विठ्ठल हारपवडे सहभागी झाले होते.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.