यंदा महापुराला भिडणार रेस्क्‍यू बोट; विन्स हॉस्पिटलतर्फे पंचगंगेत चाचणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, हॉस्पिटल्स, दुकाने, अपार्टमेंटस्‌ना महापुरापासून सुरक्षित उपाय घेण्याचे आवाहन केले आहे. 

कोल्हापूर : महापुराच्या धोक्‍यापासून अलर्ट राहावे, यासाठी महावीर महाविद्यालय परिसरातील विन्स हॉस्पिटलतर्फे पंचगंगा नदीत आज रेस्क्‍यू बोटीची चाचणी घेण्यात आली. आठ सीटर ही बोट असून, हॉस्पिटलतर्फे दहा लाईफ जॅकेटस्‌ची खरेदी केली आहे. 

पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, हॉस्पिटल्स, दुकाने, अपार्टमेंटस्‌ना महापुरापासून सुरक्षित उपाय घेण्याचे आवाहन केले आहे. 
गतवर्षीच्या महापुराच्या तडाख्यात खानविलकर पेट्रोल पंप, महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे नुकसान झाले होते. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विन्स हॉस्पिटलच्या जनरेटर, इलेक्‍ट्रॉनिक पॅनेल्स, ऑक्‍सिजनला प्लांटलाही त्याचा फटका बसला होता. हॉस्पिटलतर्फे सप्टेंबर 2019मध्ये दीड लाखांची आठ सीटर रेस्क्‍यू बोट खरेदी केली. लाईफ जॅकेटस्‌चीही खरेदी केली आहे. 2005 ची पूररेषा गृहीत धरून जनरेटर, इलेक्‍ट्रॉनिक पॅनेल्स, ऑक्‍सिजन प्लांटस्‌ बसवले होते. मात्र, 2019 ला पूररेषा आठ ते नऊ फुटांनी वाढल्याने हॉस्पिटलने आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे. पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाहणीही केली. बोटीचे चाचणी घेण्याचे आवाहनही केले होते. त्यानुसार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पंचगंगा नदीत चाचणी केली असता, बोट सुस्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हे पण वाचा - ... फक्त एवढेच शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र ; या आहेत अटी
 

याबाबत डॉ. संतोष प्रभू म्हणाले, ""पुराचा धोका लक्षात घेत हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन प्रोड्यूसिंग प्लांट बसवला आहे. त्याद्वारे दिवसात 55 ऑक्‍सिजन सिलिंडर्सची निर्मिती होते. हॉस्पिटलमध्ये शंभर बेड असून, पुरात प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्यासाठी आवश्‍यक रेस्क्‍यू साहित्याची खरेदी झाली आहे.'' 

हे पण वाचा -  धक्कादायक ; भाजप कार्यकर्त्याच्या गाडीने तीन महिलांना चिरडले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescue boat tested by Vince Hospital in kolhapur Panchganga river