
सकाळी आठपासून मतमोजणी प्रारंभ होणार असला तरी कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (१८) होत आहे. ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी आठपासून मतमोजणी प्रारंभ होणार असला तरी कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
एकूण १०२५ ग्रामपंचायती असून निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींचा आकडा ४३३ होता. पैकी ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने मतदान झाले. गावा-गावांतील कार्यकर्त्यांची यंत्रणा मतदारांना बाहेर काढण्यात सज्ज होती. मतदानानंतर कोणाला किती मतदान पडणार, याची गोळाबेरीज करण्यात ती व्यस्त झाली. सोमवारी मतमोजणी होणार असून निवडून कोण येणार, याबद्दल त्यांच्यात पैजाही लागल्या आहेत.
हेही वाचा - आरोग्य राज्य मंत्री राजेश पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले -
करवीरच्या होणार सहा फेऱ्या
कुडित्रे ः करवीर तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (ता. १८) होणार आहे. एकूण ६ फेऱ्या व ३६ टेबलवर १०८ कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असून सायंकाळी पाचपर्यंत मतमोजणी संपेल, अशी माहिती निवडणूक अधिकारी सूत्रांनी दिली. १ लाख २७ हजार ५८५ पैकी १ लाख १२ हजार ५७४ मतदान झाले. पहिल्या फेरीत आडुर, भामटे, आमशी, कोपार्डे, कोगे, कळंबे, गाडेगोंडवाडी, बाचणी, पाटेकरवाडी, म्हालसवडे येथील मतमोजणी होईल.
दुसऱ्या फेरीत कुडित्रे, गर्जन, महे, वाडीपीर, घानवडे तेरसवाडी, हळदी, देवाळे, पडवळवाडी, रजपूतवाडी येथील मतमोजणी होईल. तिसऱ्या फेरीत कुर्डू, येवती, बेले, कुरुकली, कोथळी, सडोली खालसा, भुयेवाडी, खेबवडे, वडकशिवाले तर चौथ्या फेरीत केर्ली, तामगाव, बालिंगा, पाडळी खुर्द, शिंदेवाडी, साबळेवाडी, हणमंतवाडी, नागदेववाडी तर पाचव्या फेरीत खुपिरे, हलसवडे, सांगवडे, इस्पुर्ली, नंदगाव, गिरगाव, न्यू वाडदे, कोगिल खुर्द, कोगील बुद्रुक, तर सहाव्या फेरीत निगवे दुमाला, मुडशिंगी, शिये येथील मतमोजणी होईल.
हेही वाचा - महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; झारापमध्ये वाहन चालकाचा अपघाती मृत्यू -
संपादन - स्नेहल कदम