गंवड्याचा अहवाल पॉझिटिव्ह; भादोले गाव केले लॉकडाउन 

Rumor report positive; Bhadole village lockdown
Rumor report positive; Bhadole village lockdown

पेठवडगाव : भादोले (ता. हातकणंगले) येथील 50 वर्षांच्या गवंड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सुमारे 23 जणांना अतिग्रे येथील  कोरोना कक्षामध्ये स्वॅब तपासणीसाठी पाठवले. संपर्कात आलेल्यांमध्ये दोन डॉक्‍टरांचा समावेश आहे. दरम्यान, गावात लॉकडाउन जाहीर केला असून बाधित व्यक्तीची गल्ली सील केली आहे. 

भादोले येथील वालाबापू गल्लीत व्यक्ती पत्नी, दोन मुलांसह राहते. गावातच ते गवंडीकाम करतात. संबंधित गवंड्यास पाच दिवसांपूर्वी ताप व श्‍वसनाचा त्रास सुरू होता. त्यांनी गावातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. गेले चार दिवस उपचारानंतरही बरे न वाटल्याने प्राथमिक उपचार केंद्रात हलवले. त्यानंतर वडगावातील खाजगी रुग्णालयातून सोमवारी भादोले आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरानी एक्‍सरे काढण्याचा सल्ला दिला.

बाहेर एक्‍सरे काढल्यानंतर आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टरांनी न्यूमोनियाची लक्षणे दिसल्यामुळे सीपीआरला पाठवले. तेथे स्वॅब घेतल्यानंतर मंगळवारी रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर संपर्कातील दोन डॉक्‍टरांसह 21 जणांना अतिग्रे कोरोना कक्षात पाठवले. संपर्कात आलेल्यामध्ये घरातील तिघे, चार भाऊ, डॉक्‍टर दोन, रुग्णालयातील कर्मचारी, दोन रिक्षाचालक, खासगी चालक असे 23 जण आहेत. दरम्यान, गावातील मार्ग बंद केले आहेत. 

संसर्ग कसा झाला? 
पॉझिटिव्ह रुग्णाला संसर्ग कोठे झाला हे शोधण्याचे आव्हान आहे. ही व्यक्ती गावातीलच किरकोळ बांधकामाची कामे करते. गेल्या महिनाभरापासून ती बाहेरगावी गेलेली नाही अशी माहिती घरच्यांनी दिली. मग त्यांना संसर्ग कसा झाला हे शोधणे आव्हान आहे. 


कोल्हापूर

कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com