esakal | "परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणे केंद्र सरकारला मान्य नसावं"

बोलून बातमी शोधा

Rural Development Minister Hasan Mushrif criticism on waze case kolhapur political update marathi news

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली आहे.काय म्हणाले वाचा सविस्तर...

"परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणे केंद्र सरकारला मान्य नसावं"
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्याच बरोबर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख मुंबईचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला (एनआयए) यांची तडकाफडकी बदली करून त्या ठिकाणी वर्मा नावाचे अधिकारी याठिकाणी रुजू  झाले या घटनेने  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून आपले मत व्यक्त केले आहे. काय म्हणाले हसन मुश्रीफ जाणून घेऊया.

हसन मुश्रीफ म्हणाले, मला शंका होती मी सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके ठेवली होती. ती स्फोटके ठेवणारा कोण? कशासाठी ठेवली, त्याचा उद्देश काय होता ? वास्तविक हा तपास करण्याची आवश्यकता होती .परमबीर सिंग यांनी ज्यावेळी पत्र लिहिले होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की, हे या गटामध्ये सामील आहेत आणि ते माफीचा साक्षीदार  होऊ इच्छितात. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असे त्यावेळी असंही त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले,आज माझी खात्री झालेली आहे. अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केले असावे आणि केंद्र सरकारला ते  मान्य नसावं. परमवीर सिंग वाजे प्रकरणात सहभागी असावेत याचा तपास अजून का होत नाही व त्यांची रवानगी कोठडीत झाली तरी देखील त्यांची चौकशी झाली नाही इतका मोठा तपास सुरू असताना बदली मग कशासाठी काहीतरी नक्कीच शिजत असून याची चौकशी झाली पाहिजे अशी शंका उपस्थित करून हसन मुश्रीफ आणि मागणीही केली आहे.

संपादन-अर्चना बनगे