''भाजपकडून महाविकास आघाडीला उकसवण्याचे कटकारस्थान'' 

सुनील पाटील
Sunday, 13 September 2020

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. यासाठी हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने काही अजेंडे तयार केले आहेत
 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी विविध अजेंडे तयार केले आहेत. यामध्ये भाजपला यश आलेले नाही, त्यामुळे भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहे, पण महाविकास आघाडी भक्कम असून भाजपच्या असल्या कटकारस्थानापासून सावध रहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. यासाठी हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने काही अजेंडे तयार केले आहेत. त्या अजेंड्यानूसार त्यांना यश मिळत नाही. पहिला अजेंडा सुशांतसिंह रजपूत आत्महत्या की हत्या यावर चर्चा केली जात आहे. त्यानंतर अमली पदार्थ सेवनाचा विषय यामध्ये विनाकारण राज्य सरकार आणि गृह खात्याची बदनामी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये सुशांतसिंह बाबत हंम ना भुलेंगे, ना भुलाने देंगे अशा पध्दतीेच फलक लावले आहेत. सुशांतसिंह बिहारमध्ये त्याचे राजकारण केले जात आहे.

हेही वाचा- ढगफुटीमुळे झाले ऐतिहासिक पन्हाळागडाचे नुकसान

लोकसभेचे कॉग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी म्हणतात की रिया चक्रवर्ती पश्‍चिम बंगालची आहे. त्यांचे वडिल सैन्यात होते. एका बाजूला सुशांतसिंह बिहारचा आणि रिया चक्रवर्ती पश्‍चिम बंगालची या दोन्ही राज्यात निवडणूक सुरु आहे. या दोन्ही राज्यातील राजकारणामध्ये महाराष्ट्राची बदनामी का करण्याचे कट कारस्थान केले जात आहे. याशिवाय, मुंबई पाकव्याप्त काश्‍मिर आहे. मुंबई पोलीस बिनकामाचे आहेत. माझे संरक्षण करु शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना रावणाच्या भूमिकेत दाखवायचे शरद पवार यांना धमकीचे हे सर्व उचकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजपच्या हातात काहीही राहिलेले नसल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. 

हेही वाचा-शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पहिली यादी झाली जाहीर - ​

श्‍वेतपत्रिकेची विनंती करणार 
बिहारमध्ये भाषण करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य शासनाची दहशत असा उल्लेख केला आहे. हे ऐकूण धक्का बसला. वास्तविक 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांना विनंती करणार आहे, की देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आणि आता महाविकास आघाडीचे सरकार असताना कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती. श्‍वेतपपत्रिका काढायला सांगणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

फडणवीसांनी 302 कलमाखाली आरोपी असणाऱ्या कार्यकर्त्याला अध्यक्ष केला मी कामगारमंत्री असताना बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले होते. यामध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले होते. माजी मुख्यमंत्री यांनी या मंडळाच्या अध्यक्षपदावर फडणवीस यांचाच कार्यकर्ता जो 302 कलमाखाली आरोपी म्हणून एक वर्ष फरार होता त्याची निवड केली होती. तरीही त्याची चौकशी नाही. त्याची चर्चा होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी झाली पाहिजे. 

हेही वाचा- Video : पोलीसांची दडपशाही ; आंदोलनापूर्वीच मराठा तरूणांना घेतले ताब्यात : कोठे घडला प्रकार वाचा... -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आग्रहामुळे राज्यातील आजी-माजी सैनिक, विधवा, शहीद जवान यांचा मालमत्ता कर रद्द केला आहे. सिमेवर आपले रक्षण करत आहे. तर त्यांच्या गावातील आणि मालमत्तेवरील कर भरायला लागू नये, यासाठी आठ ते दहा दिवसापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यामुळे, भाजपकडून उचकवून काहीही उपयोग होणार नाही. 

 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुद्र काठावर असणारा "सागर' बंगला सोडून नागपूरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारवर गेला आहे, त्याकडे लक्ष द्यावे. कोल्हापूरातही रुग्ण वाढत आहेत म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये ठिय्या मारूनच लोकांना दिलासा देत असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी दिला. तसेच, नागपूरचे आयुक्त मुंडे यांची बदली झाली. पण लोंकांनी त्यांचे कौतुक करत त्यांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव केला. याचाही उल्लेख श्री मुश्रीफ यांनी केला. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural Development Minister Hasan Mushrif speaking at a press conference at the Government Rest House