धक्कादायक : जयसिंगपुरात अधिकाऱ्यालाच बुरशीजन्य उत्पादनाची विक्री

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

पालिकेतील वसुली विभागाचे प्रफुल्लकुमार व्हनखंडे यांनी गुरुवारी किसान बेकरीतून पाव खरेदी केला. मात्र, पावाची दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहणी केली असता ते बुरशीजन्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विक्रेत्याला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

जयसिंगपूर (कोल्हापूर) : जयसिंगपूर शहरात सध्या मुदतबाह्य आणि बुरशीज्यन्य बेकरी उत्पादने विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यालाच बुरशीजन्य बेकरी उत्पादने विकण्याचे धाडस बेकरी विक्रेत्याच्या अंगलट आले आहे. बुरशीजन्य बेकरी उत्पादने विक्री केल्याप्रकरणी शहरातील वाडी रोडवरील किसान बेकरीला पालिका प्रशासनाने नुकतीच नोटीस बजावली आहे. अन्न व औषध प्रशासनालाही याबाबत कळविण्यात आले असून त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे. 

पालिकेतील वसुली विभागाचे प्रफुल्लकुमार व्हनखंडे यांनी गुरुवारी किसान बेकरीतून पाव खरेदी केला. मात्र, पावाची दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहणी केली असता ते बुरशीजन्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विक्रेत्याला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी अनेकांनी बेकरीत गर्दी केली. पालिकेत जावून श्री व्हनखंडे यांनी याबाबतची माहिती मुख्याधिकारी टिना गवळी यांना दिली. पालिका प्रशासनाने आरोग्यास अपायकारक बेकरी उत्पादने विक्री करु नये अशी सूचना दिली आहे. पालिका प्रशासाने नोटीस बजावली असून अन्न व औषध प्रशासनालाही याबाबतची कल्पना दिली आहे. 

हे पण वाचा -  दिलासादायक बातमी ; त्या व्यक्तीला भेटलेल्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह

अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नाही. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही दुकानांमध्ये मुदतबाह्य बेकरी उत्पादने आणि दूधाची विक्री सुरु असल्याच्या तक्रारी सुरु आहे. तर काही ठिकाणी जादा दराने आणि विहित वेळेव्यतिरीक्त विक्री सुरु ठेवल्याचे प्रकारही सुरु आहेत. 

हे पण वाचा - होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा मृत्यू ; यंत्रणेची उडाली झोप 

किसान बेकरीतून खरेदी केलेली बेकरी उत्पादने बुरशीज्य असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बेकरीच्या व्यवस्थापकाला नोटीस दिली आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनालाही याबाबत कळविण्यात आले आहे. 

- प्रफुल्लकुमार व्हनखंडे, वसुली विभाग प्रमुख, जयसिंगपूर पालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sales of fungal products to the officer kolhapur jaysingpur