दाजीपूर अभयारण्याजवळ सांबराची शिकार

Sambar hunting near Dajipur Sanctuary
Sambar hunting near Dajipur Sanctuary

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : दाजीपूर अभयारण्यातील मांढरेवाडी शिवाराच्या पायथ्याला असलेल्या राधानगरी तलावाच्या काठावर सांबराचा मृतदेह तरंगताना आढळला. चार दिवसांपूर्वी याची शिकार झाली की अन्य कशाने मृत्यू झाला याबाबत संभ्रम आहे.
राधानगरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या मांढरेवाडी गावापासून उत्तरेकडे राधानगरी जलाशयाच्या काठावर हे सांबर मृतावस्थेत आढळले आहे. चार दिवसांपूर्वीच स्थानिकांना ते दिसून आले असून, त्याची शिकार झाली असावी, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर याबाबत वन्यजीव विभागाला कळवले कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाहून याची रानकुत्र्याकडून शिकार झाली असावी, असा तर्क केला; मात्र त्याची उत्तर तपासणी वैद्यकीय तपासणी केली नसल्याचा दावा स्थानिकांनी केल्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत सांबर अजूनही पाण्याच्या काठावर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याचा शोध घेण्याचे आव्हान आता वनखात्यापुढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com