
ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्लब हाऊसमधून मतदान करणार आहेत.
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा महापौर कोण होणार याचा फैसला होण्यासाठी उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्लब हाऊसमधून मतदान करणार आहेत.
साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात झाली असून छाननी पुर्ण झाली आहे. माघारीची मुदत १५ मिनिटे दिली होती. काही मिनीटातच राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी माघार घेतली आहे.
भाजप महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जे उमेदवार ऑनलाइन दिसत नाही त्यांचे मतदान कसे होणार? असा आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया बरोबर नाही असा सवाल केला आहे.तर जे ऑनलाईन दिसणार नाहीत त्यांना गैरहजर समजण्यात येईल का असाही प्रश्न उपस्थित केला. यावरून गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा- दिग्विजय सूर्यवंशी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार -
हेही वाचा- तयारी जय्यत: लक्ष महापौर निवडीकडे ; आघाडीचे मतदान कोल्हापुरातून तर भाजपचे सांगलीतून
संपादन- अर्चना बनगे