'तो' केस गोळा करण्यासाठी फिरस्ती करतो, ऑर्केस्ट्रात ताशा वाजवतो, गळ्यात कवड्याची माळ घालून देवीचा गोंधळ ही घालतो अन् अजुन...

Sanjay Chavan of Pethwadgaon is an folk artist
Sanjay Chavan of Pethwadgaon is an folk artist
Updated on

कोल्हापूर - कागलच्या पंचक्रोशीत केस गोळा करण्यासाठी फिरस्ती करायची, ऑर्केस्ट्रात कैची व ताशा वाजवायचा, गळ्यात कवड्याच्या माळा व कपाळाला हळदी-कुंकवाचा मळवट भरून गोंधळ घालायचा, दुचाकी दुरूस्तीचे ज्ञान नसतानाही गाडीवर स्पिकर बसवून हिंदी-मराठी गाणी ऐकण्याचा धंद जपायचा. पेठ वडगावच्या संजय नाना चव्हाण यांची ही कहाणी आहे.

मनमुराद आनंद घेत जगणारा हा अवलिया गाणी म्हणण्यातही कमी नाही. त्यांची गाडी आणि त्यावरील टेप रेकॉर्डवरील गाण्यांचा आवाज, गावागावांत चांगलाच 'फेमस' झाला आहे.

पाचवीच्या वर्गात अक्षरांशी बिनसल्यावर श्री. चव्हाण यांनी पिढीजात गोंधळी परंपरेत लक्ष घातले. उदरनिर्वाहासाठी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकांच्या लग्नांत गोंधळी गीत सादर करत त्यांनी रात्री जागवल्या. मित्राने एखादे वाद्य वाजवले, की त्याचा आवाज त्यांच्या डोक्‍यात बसायचा. ताशा व कैची वादनासाठी त्यांना कोणाकडे जाऊन प्रशिक्षणाची गरज भासली नाही. कोल्हापुरातल्या इनकार ऑर्केस्ट्रात ते ही वाद्ये वाजवण्याचे काम करतात.

कागल, लिंगनूर, करनूर, निपाणी, अप्पाचीवाडी, कोगनोळी, सिद्धनेर्ली, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी परिसरात ते केस खरेदी करण्याचे काम करतात. "महाराज' म्हणून ते इथल्या घरा-घरांत ओळखले जातात. खरेदी केलेल्या केस विगसाठी ते विक्री करतात. त्यातून त्यांची चांगली आर्थिक कमाई होते. गाणी ऐकण्याचा त्यांचा छंद गावोगावच्या ग्रामस्थांना माहीत आहे. दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या दुचाकीवर त्यांनी बॅटरीला टेप रेकॉर्डर बसवला आहे. दोन स्पिकरही बसवले आहेत. त्याची आवश्‍यक माहिती त्यांना नव्हती. मेमरी कार्डमध्ये त्यांनी सातशे गाणी रेकार्डिंग केली आहेत. जुनी गाणी ऐकण्याची त्यांनी विशेष आवड आहे.

आई, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा श्री. चव्हाण यांचा कुटुंब कबिला आहे. पत्नी लक्ष्मी व मुलगा रोहित एमआयडीसीत काम करतो. विशाल पाचवीत आहे. घरखर्चासाठी महिन्याकाठी ते पंधरा हजारांची कमाई करतात.

आमचे कुटुंब तुळजाभवानीचे भक्त आहे. गोंधळ घालणे ही आमची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गोंधळ घालण्याची परंपरा असल्याचे आम्ही ऐकत आलो आहोत.
- संजय नाना चव्हाण .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com