शुल्क भरा, तरच ऑनलाईन अभ्यासक्रम ; शाळांचा पालकांकडे तगादा

School manegment beg parents for fee in belgum
School manegment beg parents for fee in belgum

बेळगाव - कोरानामुळे अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे प्रवेश शुल्क भरण्यासह इतर गोष्टीत काही प्रमाणात सूट देण्याची मागणी होत आहे. मात्र, शहरातील काही खासगी माध्यमांच्या शाळा वार्षिक शुल्क भरा तरच ऑनलाईन अभ्यासक्रम दिला जाईल, अशी सक्‍ती करत आहेत. त्यामुळे पालकांसमोर संकट निर्माण झाले आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब झाल्याने शहरातील काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. मात्र लॉकडाउन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांना शुल्क भरण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे काही दिवस सवलत देण्याची मागणी पालकांतून होत आहे. परंतु, खासगी शाळा शिक्षण खात्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत पालकांना वार्षिक शुल्क भरा अन्यथा ऑनलाईन अभ्यासक्रम पाठविला जाणार नसल्याचे सांगत शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे काही पालक अभ्यासक्रम देणार नाहीत, या भितीने शुल्क भरत आहेत. 

शाळांनी पालकांना शुल्क भरण्यासाठी मुदत देण्याची आवश्‍यकता आहे. सद्य:स्थितीत अनेकांचे व्यवहार ठप्प झाल्याने काही पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सर्वांना वेळेत शुल्क भरणे शक्‍य होत नाही, याची दखल खासगी शाळांनी घ्यावी, अशी मागणी पालकांतून केली जात आहे. तसेच शिक्षण खात्यानेही पुन्हा एकदा सर्व शाळांना शुल्क वसुलीसाठी तगादा लावू नये, अशी सूचना करावी, अशी मागणीही केली जात आहे. 
 

"सर्व शाळांना पहिल्या दिवसापासून प्रवेश शुल्क किंवा इतर शुल्क भरण्याची सक्‍ती करु नये, अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचे सर्व शाळांनी पालन करणे आवश्‍यक आहे. कोणत्याही पालकांवर शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये.'' 
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी 
 

संपादन - मतीन शेख 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com