राष्ट्रीय महिला कुस्ती निवड चाचणीत कोल्हापुरी शड्डू घुमला!

मतीन शेख
Sunday, 17 January 2021

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच महिला मल्लांना स्पर्धेत उतरता आले.

कोल्हापूर : वरिष्ठ राष्ट्रीय महिला निवड चाचणीत कोल्हापुरच्या महिला मल्लांचा शड्डू घुमला आहे. आग्रा (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या 23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदेसह कोल्हापुरच्या सात महिला कुस्तीपट्टू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.        

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आज स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र (कात्रज) येथे कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून निवड चाचणी स्पर्धा पार पडली. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच महिला मल्लांना स्पर्धेत उतरता आले. यावेळी कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, तांत्रिक सचिव प्रा. बंकट यादव, ललित लांडगे, शेखर शिंदे, गणेश कोहळे, भरत मेकाले उपस्थितीत होते.

हेही वाचा - मतमोजणी होणार असून निवडून कोण येणार, याबद्दल पैजाही लागल्या आहेत

आग्रा येथे 30 ते 31 जानेवारी अखेर राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा होणार आहे. गेल्या आठवड्यात पुरुष मल्लांची निवड चाचणी पार पडली होती. आज पार पडलेल्या महिला निवड चाचणी मुळे वर्षभरापासून स्पर्धेपासून दुर असलेले मल्ल परत कुस्तीच्या प्रवाहात आले आहेत.

निवड चाचणीत कोल्हापुरच्या दंगल गर्ल सरस...

वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्तीसाठीची हा निवड चाचणीतील दहा पैकी आठ वजनी गटात कोल्हापुरच्या महिला कुस्तीपट्टू प्रतिस्पर्धींवर भारी ठरल्या. राज्यभरातून या स्पर्धेत कुस्तीगीर उतरल्या होत्या. स्पर्धेत झालेल्या अटीतटींच्या लढतीत कोल्हापुर जिल्ह्यातील सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करणाऱ्या मल्लांनी बाजी मारली.

हेही वाचा - विशेष म्हणजे, कसलीही भिती न बाळगता ग्राहकांनीही चिकनची खरेदी केली 

 

या चाचणीतून निवडलेला महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे...

50  किलो - स्वाती शिंदे (कोल्हापूर), 53  किलो - नंदिनी साळोखे (कोल्हापूर), 55  किलो - दिशा कारंडे (कोल्हापूर), 57 किलो - विश्रांती पाटील (कोल्हापूर), 59 किलो - अंकिता शिंदे (कोल्हापूर), 62 किलो - भाग्यश्री फंड (अहमदनगर), 65 किलो - श्रुष्टी भोसले (कोल्हापूर), 68 किलो - ऋतुजा संकपाळ (कोल्हापूर), 72 किलो - प्रतीक्षा बागडी (सांगली), 76 किलो - पौर्णिमा सातपुते (कोल्हापूर) 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for senior wrestling competition selection of kolhapur girls for national level in kolhapur