पॉलिटेक्‍निक, फार्मसी प्रवेशासाठी सातव्यांदा मुदतवाढ

Seventh Times Extension For Admission For Polytechnic, Pharmacy Kolhapur Marathi News
Seventh Times Extension For Admission For Polytechnic, Pharmacy Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : गेल्या महिनाभरापासून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. पॉलिटेक्‍निक, फार्मसीला अर्ज करण्यासाठी सातव्यांदा मुदतवाढ दिली आहे. मुळातच यावर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वर्षासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे उशिरा सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रिया मराठा आरक्षणाचा पेचामुळे थांबविल्या. त्यानंतर शासनाच्या कोणत्याच सूचना नसल्याचे सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया गेल्या महिनाभरापासून ठप्प झाल्याने विद्यार्थी चिंतातूर बनले आहेत. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचा ताण कमी करावा, अशी पालकांची मागणी आहे. 

ऑगस्ट महिन्यात अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्‍निक, फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयचे प्रवेश सुरू आहेत. लॉकडाउनमुळे अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याने दोनदा मुदत वाढविली. गेल्या महिन्यात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशही संबंधित संस्थेत निश्‍चित केले. दुसऱ्या फेरीवेळी आरक्षणाचा पेच निर्माण झाला. तेव्हापासून ही प्रक्रिया ठप्प आहे. 

जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि येथे अकरावी विज्ञानची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आहे. ही प्रक्रियाही पहिल्या फेरीनंतर लटकली आहे. साहजिकच सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर ताण आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॅलिटेक्‍निक, फार्मसीची केंद्रीय पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याच्या मुदतीला दोन महिन्यांत तब्बल सातव्यांदा तारीख पे तारीख सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही गुणवत्तायादी व विकल्प भरण्याच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. याबाबत शासनाचे कोणतेच आदेश नसल्याने प्रवेश प्रक्रिया यंत्रणेची कोंडी झाली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने पालकांना बसत आहे. 

कोणीच माहिती द्यायला तयार नाही 
आयटीआयची पहिली यादी जाहीर झाली. दुसऱ्या फेरीसाठी विकल्प भरले आहेत. पंरतु, प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे सांगून महिना लोटला आहे. त्याबाबतीत कोणीच माहिती द्यायला तयार नाही. 
- आकाश म्हेत्री, आयटीआय, प्रवेशोत्सुक विद्यार्थी 

प्रवेशाची चिंता 
गेल्या महिन्यात अकरावी विज्ञानला प्रवेश मिळालेली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर दुसयाच दिवशी प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर आजअखेर प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्याबाबत हालचाली नसल्याने प्रवेशाची चिंता आहे. 
- नुमान मुल्ला, विद्यार्थी, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com