"शिवसेना ही मधमाश्‍यांच्या पोळ्याप्रमाणे,हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास माश्‍या मागे लागतील"

Shiv Sena district chief Sanjay Pawar criticism on chandrakant patil political marathi newsmarathi
Shiv Sena district chief Sanjay Pawar criticism on chandrakant patil political marathi newsmarathi

कोल्हापूर :  गेल्या सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असतानाही चंद्रकांत पाटील यांनी काय दिवे लावले, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अपघाताने झाले की कसे, हे बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. पाटील यांच्या प्रमाणपत्राची मुख्यमंत्र्यांना गरज नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 


संजय पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच शिवाय ते शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत हे ध्यानात ठेवावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भाजप राज्यात मोठी झाली हे विसरू नये. भाजप नेत्यांच्या रक्तातच विश्‍वासघात आहे. चंद्रकांत पाटील हे क्रमांक दोन नंबरचे मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले. पोकळ घोषणेशिवाय काहीही झालेले नाही. 

कोरोनामुळे राज्य अडचणीत असताना मुख्यमंत्र्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र शिवसेना ही मधमाश्‍यांच्या पोळ्याप्रमाणे आहे तिच्यावर हल्ला करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अन्यथा माश्‍या मागे लागल्या तरी काही खरे नाही हे ध्यानात ठेवावे. सत्ता नसल्याने पाण्याविना तडफडणाऱ्या  माशासारखी तशी भाजप नेत्यांची अवस्था झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते व चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष राहावेत अशी आमची इच्छा आहे. पाटील यांचा पायगुण चांगला आहे की राज्यातील भाजप संपत चालली आहे.’’ 

विजय देवणे म्हणाले, ‘‘राज्यातील सत्ता गेल्याने भाजपला पोटशूळ उठला आहे. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यामुळे टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक सहन करणार नाही.’’ या वेळी शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, मंजित माने उपस्थित होते.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com