esakal | Corona Side Effects : मुलगा-सुनेकडून आमचा छळ होतोय तर आमचं जगणं मुश्‍किल झाल्याचं मुलांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

Side effects of corona lockdown covid 19 health marathi news

करवीर तालुक्‍यातील शहरालगत असणाऱ्या एका गावात मुलाने पत्नीचे ऐकून आई-वडिलांना घराबाहेर काढलं आहे.

Corona Side Effects : मुलगा-सुनेकडून आमचा छळ होतोय तर आमचं जगणं मुश्‍किल झाल्याचं मुलांचे मत

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : सून त्रास देते. मुलगा पाहत नाही. आम्हाला मुलाने घराबाहेर काढलं आहे, अशी पालकांची तक्रार आणि कोरोनामुळे आमचं काम गेलं, पती-पत्नी, दोन मुलांचे खाणंही मुश्‍किल झालं आहे. आई-वडिलांना कसं सांभाळणार, असं म्हणून मुलं पालकांची जबाबदारी झटकत आहेत. लॉकडाउननंतरचे हे वास्तव आहे कोल्हापूर आणि पुढारलेल्या तालुक्‍यातील. मुलांनी पालकांना पोटगी द्यावी, असा कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत ही प्रकरणे आता प्रांतांकडे येत आहेत. 

कोरोना लॉकडाउनचे साईड इफेक्‍ट

करवीर तालुक्‍यातील शहरालगत असणाऱ्या एका गावात मुलाने पत्नीचे ऐकून आई-वडिलांना घराबाहेर काढलं आहे. त्यांचा मुलांकडून सांभाळ होत नाही. मुलगा म्हणतो मी रिक्षा चालवतो. सहा-सात महिने लॉकडाउनमुळे रिक्षा बंद होती. यातच पत्नी आणि मुलांचा सांभाळ कसा करणार, हा मोठा प्रश्‍न आहे; मग आई-वडिलांना कसे सांभाळणार, असे उत्तर मुलांकडून दिले जात आहे. यामध्ये कोण चूक आणि कोण बरोबर, हे ठरवणे ऐकून घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कठीण झाले आहे. अशी एक ना अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या सर्वांमागे घरगुती किरकोळ 

वाद असला तरीही त्या वादाला आता ‘कोरोना’ लॉकडाउनची किनार आहे. कोरोनामुळे सहा महिने कडक लॉकडाउन झाले. कसे-बसे पंधरा-वीस दिवस आहे त्या पैशावर घर चालले; पण त्यानंतर अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय थांबले. किरकोळ व्यापारासह रिक्षा, टॅक्‍सी चालवणाऱ्यांची दररोजची कमाईही थांबली. दुकाने बंद, उधारी बंद यामध्ये सर्वसामान्यांचे जगणे मुश्‍किल झाले. त्यामुळे घरा-घरात सासू, सुन, सासरे, मुलांमध्ये किरकोळ असणारे वाद न्यायालयातपर्यंत जाऊ लागले आहेत.

हेही वाचा- पंचवीस वर्षापूर्वी ही फिल्म थेट सभागृहात! वीस तासांची फिल्म तयार केली ५६ मिनिटांची

अधिकाऱ्यांना मार्ग काढणे अवघड
सध्या मुलांनी पालकांना पोटगी द्यावी, असा कायदा आहे. या कायद्यानुसार याची सर्व प्रकरणे प्रांतांकडे येत आहेत. या याचिकेवर निर्णय कोणताही असो; पण परिस्थिती किती बिकट होत चालली आहे, याचे उदाहरण समोर येत आहे. यामध्ये काही ठिकाणी पालकांची चूक दिसते तर काही ठिकाणी मुलांची चूक दिसत आहे. लोकांना मात्र यावर पर्याय काढणे अधिकाऱ्यांनाही अवघड झाले आहे. आम्हालाच मिळेना आई वडिलांना कोठून देऊ, असं मुलांचे म्हणणे आणि मुलांनी मिळवून आम्हालाच द्यावे, असं पालकांचे मत. आता प्रत्येक कुटुंबात पेच निर्माण करत आहेत. यासाठी सर्वांनीच समजुतीने राहण्याची गरज आहे.

संपादन- अर्चना बनगे