esakal | वाढदिवसा दिवशीच घातला बहीण-भावावर काळाने घाला; घटनेने हिडदुग्गीसह पंचक्रोशीत हळहळ

बोलून बातमी शोधा

Sister and brother drowned in Hiddugit crime marathi news

घरात एकीकडे लहान बहिणीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच बहीण-भावाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिडदुग्गी (ता. गडहिंग्लज) येथे घडली.

वाढदिवसा दिवशीच घातला बहीण-भावावर काळाने घाला; घटनेने हिडदुग्गीसह पंचक्रोशीत हळहळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : घरात एकीकडे लहान बहिणीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच बहीण-भावाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिडदुग्गी (ता. गडहिंग्लज) येथे घडली. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. काल (ता. १०) सायंकाळी ही घटना घडली.राजवीर किशोर तराळ (वय ८) व प्रेरणा मनोहर कांबळे (१८) अशी या दुर्दैवी बहीण-भावाची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी,

किशोर तराळ हे कुटुंबीयांसह गोव्यात स्थायिक असतात. भावाचे लग्न ठरवण्यासाठी ते कुटुंबीयांसह महिन्यापूर्वी गावाकडे आले आहेत. प्रेरणा कांबळे हिची मोठी बहीण प्रज्ञा हिचा कालच वाढदिवस होता. घरात पाहुणे मंडळी आली होती. सायंकाळी वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच प्रेरणा कपडे धुवून आणते असे सांगून विहिरीकडे गेली. तिच्यासोबत राजवीरही गेला. या वेळी राजवीर हातपाय धुताना त्याचा पाय घसरला तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी प्रेरणाही पाण्यात गेली. तिलाही पोहता येत नव्हते. 

हेही वाचा- Covid19  Update: ३६ रुग्णवाहिका सज्ज;  १०८ ची सेवा गतिमान

उशिरापर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता दोघेही बुडाल्याचे निदर्शनास आले. दोघांनाही बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  आणले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मनोहर कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

संपादन- अर्चना बनगे