प्रति पंढरपूरात भारत राखीव बटालियनला मिळाली जागा....

Space granted to IRB nandwal kolhapur
Space granted to IRB nandwal kolhapur

कोल्हापूर - गेली सहा वर्षे जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या भारत राखीव बटालियनच्या (आयआरबी) जागेचा प्रश्‍न मिटला असून, प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ (ता. करवीर) येथील ४६ हेक्‍टर क्षेत्र बटालियलनला देण्याचे शासनाचे आदेश निघाले. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी या जागेचा प्रश्‍न लवकरच मिटविण्याचे आश्‍वासन दिले होते.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यासाठी राज्य राखीव दलाच्या धर्तीवर या बटालियनची 
स्थापना केली. 

८ डिसेंबर २००८ ला यासंदर्भातील आदेश निघाले, पण या बटालियनसाठीची भरती प्रक्रिया २०१३ मध्ये झाली. कोल्हापूरच मुख्यालय असलेल्या बटालियनला त्यानंतर जिल्ह्यात सोयीची अशी जागाच मिळाली नव्हती. सुरुवातीला हातकणंगले तालुक्‍यातील मजले-तमदलगे येथील जागा दिली; पण वन विभागाची जमीन यात येत असल्याने ही जागा मिळण्यात अडचण निर्माण झाली. त्यानंतर राधानगरीसह रेंदाळ, मौजे वडगांव, कासारवाडीत जागांचा शोध 
घेण्यात आला. 

गायरानातील ४६ हेक्‍टर जागा या बटालियनला

तथापि, काही ठिकाणी आवश्‍यक तेवढी जागा नव्हती तर काही ठिकाणी स्थानिकांनी या बटालियनला जागा देण्यास विरोध केला होता. त्यामुळे हा प्रश्‍न प्रलंबित होता.
बटालियन स्थापन झाल्यापासून जागाच नसल्याने त्यातील काही जवान मुंबई, पुण्यात तर काहींचा मुक्काम पिरवाडी (ता. करवीर) येथील भाड्याच्या हॉलमध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी नंदवाळच्या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या समादेशक यांनीही अलीकडेच या जागेची पाहणी करून ही जागा योग्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर शासनाने या गावांतील गायरानातील ४६ हेक्‍टर जागा या बटालियनला देत असल्याचे आदेश काढले.

दृष्टिक्षेपात बटालियन

  •  नव्या बटालियनची स्थापना- ८ डिसेंबर २००८
  •  बटालियनसाठी भरती- डिसेंबर २०१३
  •  बटालियनच्या जवानांची संख्या- ७५०
  •  इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या- २५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com