दिव्यांग सुप्रियाची जिद्द ; मटेरिअलच्या ऑनलाईन विक्रीतून झाली आत्मनिर्भर

special story of navratri miss supriya start a online buying business in kolhapur ichalkaranji
special story of navratri miss supriya start a online buying business in kolhapur ichalkaranji

कोल्हापूर : कोरोनामध्ये बसून चालणार नाही. महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने वेळेचा सदुपयोग करायचा कसा, असा प्रश्न अनेकांना पडला. इचलकरंजीतील दिव्यांग सुप्रिया काटकर हिने या प्रश्नावर उत्तर शोधले. लॉकडाउन काळात मटेरिअलची ऑनलाईन विक्री सुरू केली आणि स्वअर्थार्जनाचा तिला मार्ग सापडला आणि त्यातून आत्मनिर्भर बनण्याची वाटचाल सुरू झाली. मनात जिद्द असेल तर काहीही करणे अवघड नसल्याचे ती सांगते.

सुप्रियाने दहावीपर्यंत दत्ताजीराव कदम एज्युकेशनच्या इचलकरंजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. कन्या महाविद्यालयात तिने बी.ए. भाग दोनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ए. एस. कॉलेजमधून पदवी मिळवली. शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातून ती २०१६ ला एम. ए. झाली. त्यानंतर २०१७ ला सेट उत्तीर्ण होऊन २०१९ ला तिला पीएच.डी.साठी प्रवेशही मिळाला. कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापक म्हणून ती रुजू झाली.

कोरोनाच्या संचारबंदीने तिच्या लेक्‍चरशिपवर मर्यादा आली आहे. घरी स्वस्थ बसणे तिला मान्य नाही. त्यामुळे तिने ऑनलाइन ड्रेस, आर्टिफिशियल ज्वेलरी, शूज, सॅंडलसह अन्य वस्तू विक्री करण्यास सुरुवात केली आहे. एका मैत्रिणीची तिला त्यासाठी मदत मिळते. व्हॉट्‌सॲपद्वारे वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवणे, ज्यांना पसंत पडतील त्यांना घरपोच करणे व त्याच वेळी घेण्याची सोय उपलब्ध केली आहे. तिच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नाला यश मिळत आहे. ज्या ग्राहकांना मटेरिअल खरेदी करायचे आहे, त्यांना ती घरपोच देत आहे. ती म्हणाली, ‘‘कोरोनात हार मानून चालणार नाही. स्वतःतील कौशल्य वापरून छोटा व्यवसाय करायला हवा, हाच विचार डोक्‍यात ठेवून मी काम करत आहे.’’  

आणि विचार बदलला

सुप्रियाला केवळ २५ टक्के दिसते. शिक्षण घेताना आईची मदत झाल्याचे ती सांगते. स्पर्धा परीक्षा देण्याची तिची इच्छा होती; मात्र इंग्रजी अधिविभागातील प्रा. डॉ. मनोहर वासवानी यांना आदर्श मानून तिने प्राध्यापक होण्याचे ठरवले आणि तिचा विचार बदलला.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com