'पिचकारी नव्हे तर,कोरोनाचे स्फोटकच' : थुंकीमुक्त कोल्हापूर मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद

मतीन शेख
Sunday, 27 September 2020

अँटी स्पीट मूव्हमेंटच्यावतीने चळवळीला प्रारंभ

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय आरोग्याच्या समस्या निर्माण करते.कोरोना महामारीत थुंकण्याच्या प्रकारातून संसर्गाची मोठी भिती आहे.परंतू सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार सर्रास घडतात. या समस्येवर लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आज ताराराणी पुतळा चौक (कावळा नाका) येथे ‘अँटी स्पिट चळवळीच्या’ माध्यमातून  सिग्नल जवळ जनजागृती करणारे स्लोगन असलेले बॅनर, पोस्टर हातात धरून मोहीम सुरु करण्यात येणार आहे.'माझं कोल्हापूर थुंकीमुक्त झालंच पाहिजे','आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर ठेवलेच पाहिजे,' अशा घोषणामुळे ताराराणी चौक दुमदुमून गेला. 

सोशल डिस्टन्स पाळत 'अँटी स्पीट मूव्हमेंट'चे कार्यकर्ते चौकात वेगवेगळ्या कॉर्नरवर उभे राहून घोषणा देत थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याच्या चळवळीस प्रारंभ झाला. यावेळी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना माहितीपत्रके वाटप करण्यात आली. तसेच थुंकीमुक्त स्लोगन असलेले बॅनर आणि पोस्टर हातात धरून घोषणा देत असल्यामुळे चौकात एक वेगळा उत्साह आला होता या मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

हेही वाचा- ‘चेतना अपंगमती’मधील ‘सीआयडी’ची चटका लावणारी एक्‍झिट..! -

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाचा प्रसार वाढू नये.  तसेच ही अनिष्ट सवय दूर सारून शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प यानिमित्ताने उपस्थितांच्यास वतीने करण्यात आला. थुंकीमुक्त कोल्हापूर बनवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर आणि सारिका बकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला विविध सामाजिक संस्थांनी पाठबळ दिल्यामुळे आता ही चळवळ सर्वांची बनली आहे. आजच्या मोहिमेला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर उपस्थित होते. तसेच आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर, कविता जांभळे, अभिजित गुरव, गीता हसुरकर,दिपक देवलापूरकर, भानुदास डोईफोडे, समीर पंडितराव,विजय धर्माधिकारी, कल्पना सावंत, स्मिता देशमुख, नीना जोशी, सुनीता मेंगाणे, संघसेन जगतकर, संदेश वास्कर यांनी संयोजन केले.

हेही वाचा- कोल्हापुरात एका क्लिकवर मिळणार केअर सेंटरचे अपडेट -

सकारात्मक प्रतिसाद

सिग्नलला एक रिक्षा थांबली असता रिक्षाचालकाने पिचकारी मारली यावेळी मोहिमेतील कार्यकर्ते आनंद आगळगावकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या रिक्षा चालकाला विनंती करून रस्त्यावरीची थुंकी पुसण्याची विनंती केली त्याला रिक्षा चालकाने सकारात्मक प्रतिसाद देऊन रिक्षातून उतरून पिचकारी कापडाने पुसली.तसेच अनेक गाडीचालक अंगठा दाखवून जाता जाता पाठिंबा देत होते.  

सकाळच्या 'त्या' वृत्ताचे चळवळीत रुपांतर

'पिचकारी नव्हे तर,कोरोनाचे स्फोटकच' या शिर्षकाखाली सकाळने ग्राऊंंड रिपोर्ट करत कोल्हापुरातील थुंकी स्पॉट नमुद करत, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने कोरोनाचे संसर्ग वाढू शकतो असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र थुंकण्याविरोधात चळवळ उभा राहिली आहे. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spit free Awareness Campaign Kolhapur Start the movement on behalf of the Anti-Spit Movement