महागाई विरोधात राज्यात उडणार आंदोलनाचा भडका; राजू शेट्टी 

सदानंद पाटील
Wednesday, 3 March 2021

आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर 

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल ,गॅस दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. यातच शिक्षण संस्था कडून सक्तीने वसूल होणारी फी , वाढीव वीज बिल वसुली  या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संदीप कारंडे शिवसेना, भाजप प्रवक्ते रामदास कोळी इचलकरंजी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, वैभव कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, राजेंद्र गड्यानवार, सागर संभुशेट्टे उपस्थित होते.

हेही वाचा- Wildlife Day Special : हरणांची वाढती संख्या वाघ संवर्धनाचे एक पाऊल

हेही वाचा- कोरोना’ खरेदीत ३५ कोटींचा भ्रष्टाचार ; खरेदी समितीसह लोकप्रतिनिधींकडे बोट

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state and central government State wide agitation warning in raju shetti political marathi news