कोल्हापूरात रणरागिणी झाल्या आक्रमक ; कंगना रानौत गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

'हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा', अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या

कोल्हापूर : मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतचा विरोधात आज कोल्हापूरच्या शिवसेनेच्या रणरागिणींनी कंगना राणावतचा निषेध केला. अंमली पदार्थांच्या सेवनाची कबुली देणाऱ्या कंगना रानौत विरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाने तत्काळ गुन्हा नोंद करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना शहर महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली.

हेही वाचा - नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या आणि एन.ए परीक्षार्थींसाठी कोल्हापूरातून विशेष गाडीची सोय़ : असे आहे वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कंगना रानौतच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कंगना राणावतच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करीत तिच्या प्रतिमेच्या पोस्टरचे दहन केले. याठिकाणी 'जय भवानी, जय शिवाजी', 'मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणनाऱ्या कंगना राणावतचा धिक्कार असो', 'अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या कंगना राणावत वर गुन्हा नोंद झालाच पाहिजे', 'हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा', अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका पूजा कामते यांनी, ज्या मुंबईने कंगना राणावतला नाव, पैसा, प्रसिद्धी दिली त्याच मुंबई विरोधात बोलणाऱ्या कंगना रानौतला मानसिक उपचाराची गरज आहे. तिने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी योग्यवेळी माज उतरवतील, असा इशाराही दिला.

हेही वाचा -  सावधान : पोहायला जाताय मग ही बातमी वाचाच

दरम्यान शिवसेना कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या पूजाताई भोर, गौरी माळतकर, मंगलताई  कुलकर्णी, शाहीन काझी, सुनिता भोपळे, श्रद्धा यादव, ज्योती भोसले, सिंधू घोलप, सुलभा हंकारे, पूजा शिंदे, फातिमा बागवान, शिवसेनेचे रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रमेश खाडे,  रणजीत जाधव, किशोर घाटगे, सुनील जाधव, अमित चव्हाण, राजू काझी, विक्रम पवार, सुनील भोसले, राजू काझी, अश्विन शेळके, गणेश वाळवेकर, रमेश पोवार, किरण पाटील, सुनील करंबे, अंकुश निपाणीकर, राहुल माळी, विशाल पाटील, कपिल केसरकर, सम्राट यादव, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, अशोक माने, कृपालसिंह रजपूत, प्रथमेश भालकर  उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the statement of kangana ranaut the shivsena women group protest against her demand arrest her in kolhapur