कागल, लिंगनूर कापशी एंट्रीपॉईंटवर तपासणी कडक

Strict Inspection At Kagal, Lingnur Kapashi Entry Point Kolhapur Marathi News
Strict Inspection At Kagal, Lingnur Kapashi Entry Point Kolhapur Marathi News

कागल : कागल तालुक्‍यात कागल व लिंगनूर कापशी या दोन ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. या मार्गावर एंट्रीपॉईंटवर कडक तपासणी सुरू आहे. या ठिकाणी प्रत्येक माणसाची नोंद घेऊन त्याला कोरोना काळजी केंद्रावर तपासणीसाठी पाठवले जाते. सुदैवाने तालुक्‍यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती प्रांताधिकारी रामहरी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या चार दिवसांत कागल केंद्रावर 657 लोकांची तपासणी केली असून 333 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविले आहेत, असेही ते म्हणाले. या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयश जुवेकर, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील उपस्थित होते. 

भोसले म्हणाले, ""परराज्यातून व राज्याच्या विविध भागातून जिल्ह्यात बाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी रीतसर परवानगीद्वारे लोकांची ये-जा सुरू झाली. परवाने घेऊन लोक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. कागल राष्ट्रीय महामार्गावर असून याठिकाणी दक्षिण भारतातील सहा राज्यासह कर्नाटकातील लोक मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. कागल येथे कोगनोळी टोलनाक्‍याजवळ कोरोना काळजी सेंटर उभारले आहे. तसेच लिंगनूर कापशी फाटा येथे तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना काळजी सेंटरवर लोकांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतो. कृषी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचेही मोठे सहकार्य लाभत आहे. तपासणीसाठी डॉक्‍टरांची टीम चोवीस तास कार्यरत आहे. गेल्या चार दिवसात कागल केंद्रावर 657 लोकांची तपासणी करण्यात आली असून 333 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. 

कोणीही तपासणीतून चुकणार नाही 
कोगनोळी टोलनाका व लिंगनूर कापशी या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची नोंद घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणीही नागरिक या तपासणीतून चुकणार नाही याची दक्षता शासनाने घेतली आहे. डॉक्‍टर व महसूल खाते कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकांनी सहकार्य करावे. 
- रामहरी भोसले, प्रांताधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com