होणार होता पीएसआय पण झाला गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

प्रमाणपत्राबद्दल राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना शंका आली होती.

 कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी आज विजय सदाशिव बोरकर (वय 39, शंभर फुटी रोड, सांगली) याला अटक केली. 2016 मध्ये हा प्रकार घडला होता. जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर यांनी मुलाखती वेळी नॅशनल टेंपोलीन जिम्नॅस्टिक चॅम्पियन न्यू इंग्लिश स्कूल (ता. मिरज, जि. सांगली) येथील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्राबद्दल राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना शंका आली होती.

हे पण वाचा -  ती आली जनू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना

 

त्यामुळे आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागाने प्रमाणपत्र पडताळणीची जबाबदारी शंकर भास्करे या क्रीडा अधिकाऱ्यांकडे सोपवली होती. भास्करे यांनी चौकशी केल्यानंतर विजय बोरकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भास्करे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करत आहेत. 

हे पण वाचा - खासदार संभाजीराजे यांनी तमाम खासदारांना केले हे आवाहन

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Submission of fake sports certificate for the post of Sub Inspector of Police of Maharashtra Public Service Commission