उन्हाळ्यात पर्यटन करायचे आहे?  या ठिकाणी अवश्य़  भेट द्या

Summer tourism in kolhapur amba village tourism marathi news
Summer tourism in kolhapur amba village tourism marathi news

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र म्हंटल की घनदाट जंगल, हिरवीगार वनराई , ग्रामीण संस्कृतीचा वारसा जतन आणि संवर्धन करणारे ,ऐतिहासिक वारसा लाभलेले, निर्सगसंप्पन वारसा असलेले ठिकाण . जेथे  तिन्ही ऋतुत पर्यटन करण्यास अनुकुल असणारे वातावरण आहे. अगदी  कडक उन्ह्यातसुध्दा तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. जिथे तुम्हाला करवंदे, जांभूळ,नेर्ली, फणस,आंबा अशी एक ना अनेक रानमेवा , रानभाज्या मनसोक्त खाण्याचा आनंद लुटता येईल. घनदाट वनराईत ट्रेकिंग करता येईल, देवराई म्हणजे काय याची माहिती जाणून घेता येईल.

पश्चिम घाट माथ्यावर मुबलक पडणारा पाऊस यामुळे मुबलक जलसाठा या ठिकाणी आहे. स्वराज्याचा उभारणीत पन्हाळा ते विशाळगडचा रणसंग्राम येथे सुवर्ण अक्षरनि लिहिला आहे.  या बरोबरच महाराष्ट्र मधील सर्वात देवराय वृक्ष याच ठिकाणी आढळतात. आरोग्याला लाभदायी ठरणारे वातावरण आणि त्या अनुषंगाने औषधी वनस्पती येथे आहेत.चला तर मग जाणून घेऊया..

कोल्हापूर पासून केवळ ६० कि.मी.अंतरावर निसर्ग संपन्न आणि थंड हवेच ठिकाण म्हणून आज शाहुवाडी तालुक्यातील आंबा या ठिकाणाची ओळख झाली आहे. कोकण आणि घाटप्रदेश यांना दुवा  साधणारे हे ठिकाण आहे. समुद्र सपाटी पासून ३४०० फूट उंचीवरच्या या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा आहे. ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणारे आणि कोकणी व घाटी धाटणीचे टुमदार स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करणारे हे स्थळ विकसित होऊ लागले आहे .


येथे हे आहेत वन्यजीव
वन्य जिवामध्ये सर्वात छोटे हरीण म्हणजेच गेळा (माउस डीअरअसणारे ),जगातील सर्वात मोठे फुलपाखरू आशिया पतंग (अटलास मॉथ) मलबारी पिटवायपर (चापडा) देशातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग व मोठे हरीण म्हणजे सांबर  घनदाट जंगलात आढळतात.  राज्याचे मानचिन्ह  शेखरू,जारूळ फुल ,हरेल पक्षी, नरक्या,सप्तरंगी,जायफळ कुंचला,मुरुड शेंग ,शतावरी ,इंद्रजव अश्या अनेक वनस्पतीचा ठेवा या ठिकाणी आहे. 


महत्वाची ठिकाणे 
      
अंबेस्वर देवराई ,  निसर्ग माहिती केंद्र, वाघझरा,दरयचा धबधबा,
 सासन कडा, आंबा घाट टेबल,मानोली जलाशय,सवतीचा कडा,
 पावनखिंड,जातिवंत घोड्याचे स्टड फार्म,फुलपाखरू उद्यान


उपलब्ध सोयी
       
निसर्गाची माहिती देणारे गाईड
       
उत्कृष्ट नाश्ता आणि जेवणाची सोय
       
महत्वाच्या ठिकाणी माहिती फलक
       
घनदाट जंगल फिरण्याची सोय
       
अनेक सर्व सुविधा युक्त हॉटेल
       
सुरक्षित राहण्याची सोय
       
जवळची पर्यटन केंद्र ला जाण्याची सोय
       
जगातील अनेक दुर्मिळ वनस्पती पाहण्याची संधी
       
नेहमीच्या पर्यटन क्षेत्रापेक्षा अतिशय निवांत वातावरण
       
आपुलकीने वागवणूक देणारे स्थानिक नागरिक       
अनेक पक्षांचा अभ्यास करण्याची संधी
       
जगातील सात नामांकित लढ्यामध्ये पावनखिंड लढाई
 दुसऱ्या क्रमाकांची
       
पावनखिंड लढाईचा ज्वलंत इतिहास ऐकण्याची संधी
       
विज्ञान निसर्गची आवड असणाऱ्या  विध्यार्थ्यांना संशोधनची पर्वणी


आपण काय करू शकतो
   
 एक दिवसाच्या भेटीत अनेक महत्वाची ठिकाणे पाहणे
       
कुटुंब अथवा मित्रा सहित दोन दिवसाची सहल
       

या ठिकाणी राहणे आणि जेवणाची सोय
       
घरगुती पद्धतीचे आदरातिथ्य सहित जेवण
  

कसे यास आंब्यात
पुण्यावरून आंब्यामध्ये यायचं असेल तर पुणे ते कोल्हापूरला यावे लागले. कोल्हापूर वरून रत्नागिरी राज्य महामार्गावरून मलकापूर डायरेक्ट आंबा असे येऊ शकता. 
    

 आंबाच का ?

आंबा येथील हवामान तीनही ऋतूमध्ये आल्हाददायक असते. साहशी ट्रेकिंग करण्यासाठी वाघझरा ते सासन आणि पावनखिंड ते विशाळगड असे मार्ग आहेत.सध्याच्याधावपळीच्या युगात येणाऱ्या आजारपणात आरोग्यला लाभदायी ठरणारा औषधी वनस्पतीचा ठेवा,वृक्षवेली ,प्राणी पक्षी,बुरशी  या ठिकाणी आहे. आंबा विशाळगड मार्गावर वाघाझारा ठिकाणी विश्रांती आणि वाचन करण्यासाठी बैठक व्यवस्था आहे.

आजही अनेक वेळा या ठिकाणी बिबट्या चे दर्शन होते.दुर्मिळ पिट ,राज्य पाखरू शेखरू आणि गवे हमखास दिसतात. आंबा पासून ३ किलोमीटर वर असलेल्या चाळणवाडी घनदाट सावलीतील मंदिर आणि सह्याद्री च्या रांगेतील सुमारे १०० एकर चा पठार टेबल पाइंट पर्यटकांना खुणावतो.कोकण चे सौंदर्य डोळ्यात साठवत आपणास या ठिकाणी वन भोजन करता येते.आंबा घाट टेबल पोइन्त वरून सूर्यास्त चे मनोहारी दृश्य आणि घाटाचे सौंदर्य या ठिकाणी अनुभवता येतो, या पठार वर कीटक ,सरपटणारे प्राणी आणि रानफुलांची विविधता पाहताना पुष्प उत्सवाची अनोखा नजराणा या ठिकाणी असतो.

 एका निसर्ग्य रम्य वातावरण आपणास व आपल्या कुटुंबास  निश्चित पणे आवडेल असा विश्वास  आहे.चांगले रिसोर्ट,आल्हाद दायक वातावरण  आणि निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या या पर्यटन स्थळाचा मोह आपणास नक्कीच पडेल.केवळ दीड दोन तासाच्या प्रवासानंतर  आपण या ठिकाणी पोहचू शकता. .
 
 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com