तीने जपला संस्कृतीचा ठेवा अमेरिकेतही केला मास्कचा पुरवठा..

Supply of mask in amerika kolhapur marathi news
Supply of mask in amerika kolhapur marathi news

इचलकरंजी (कोल्हापूर) : भारतीय संस्कृतीतून मिळालेले धडे आणि घरचे संस्कार यामुळेच अमेरिकेत असलेल्या मुळच्या इचलकरंजीतील युवतीने दररोज होतील तेवढे मास्क तयार करून गरजूंना पोहचविण्याचे काम करत आहे. रूपाली लंगोटे-खानाज असे या युवतीचे नाव आहे. मास्कसाठी लागणारे साहित्य मिळत नसतानाही अनेक खटाटोप करत ते साहित्य मिळवून विशेषत: वैद्यकीय सेवेत काम करणार्‍या अनेकांना त्या मास्क पुरवित आहेत.

रूपाली या 20 वर्षापूर्वी लग्नानंतर अमेरिकेत गेल्या. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी वेगळी वाट निवडली. मेंदीचा कोन हातात घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मेहंदी आर्टिस्टच्या माध्यमातून त्यांनी आरएसएल हिना अ‍ॅण्ड स्पा हा ब्रँड तयार केला आणि केवळ भारतीयांनाच नव्हे तर अमेरिकेतील नागरिकांनाही मेहंदीची वेगळी भुरळ त्यांनी निर्माण केली.
अमेरिकेतील डेलायर भागात त्या राहतात.

असे बनवले जातात मास्क

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घरातच बसून रहावे लागले अशावेळी त्यांची धडपड त्यांना स्वस्त बसू देईना. मोठ्या प्रमाणात असलेल्या मास्कच्या तुटवड्यावर त्यांनी आपण काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. घरात असलेले कापड आणि इलॅस्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र या मास्कसाठी मेटल मिळत नव्हते. ख्रिसमसमध्ये डेकोरेशनचे हंडी आडकविण्यासाठी असलेल्या साधनाचा वापर करून त्यांनी नाकावर मास्क घट्ट बसावे यासाठी त्यातील मेटल पट्टीचा वापर केला. लहानपणी आईने दिलेल्या कामाची शिकवण त्यांना उपयोगी पडली.

सामाजिक बांधिलकी ठेवली कायम

शिवण काम येत असल्याने त्यांनी सहजपणे मास्क तयार केले. हा मास्क प्रथम त्यांनी समोरच असलेल्या एका रूग्णालयातील स्टाफला दिला. त्यानंतर एका सोशल ग्रुपवर कोणत्या ठिकाणी किती मास्क लागणार आहेत याची माहिती मिळत होती. रोज तयार होतील तेवढे मास्क त्यांनी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पाठवू लागले. हे सर्व करत असताना त्यांनी मास्कचा 1 रूपयाही संबंधीताकडून घेतला नाही.देशातील संस्कृती, आई वडिलांच्या शिकवणीने 20 वर्षानंतरही अमेरिकेत राहून रूपाली यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे.

मास्क तयार करताना अनेक अडचणी येतात. मात्र त्यावरही मात करत रूग्णांवर दिवसरात्र उपचार करणार्‍या डॉक्टर आणि नर्सेसना हे मास्क पुरवित आहेत. घरातील काम सांभाळत जेवढे तयार होतील तेवढे मास्क गेले दहा ते बारा दिवस संबंधितांना पाठवित आहेत.
रूपाली लंगोटे-खानाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com